Sat, Apr 20, 2019 08:26होमपेज › Belgaon › महिलांना आरक्षण मिळवून देऊ : राहुल

महिलांना आरक्षण मिळवून देऊ : राहुल

Published On: Apr 10 2018 1:16AM | Last Updated: Apr 10 2018 1:16AMबंगळूर : प्रतिनिधी 

केंद्रात काँग्रेसचे सरकार सत्तेवर असताना महिलांना आरक्षण मिळवून देण्यासाठी अनेकदा प्रयत्न करण्यात आले. त्यानंतर सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाने महिला आरक्षण मुद्याला बगल दिली. पुढील काळात केंद्रात काँग्रेस सत्तेवर आल्यास महिलांना आरक्षण मिळवून देण्याला प्राधान्य देण्यात येईल, असे आश्‍वासन  अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यानी दिले.
येथील राजवाडा रस्त्यावरील आयट्रिया हॉटेलमध्ये रविवारी रात्री महिला साधकांशी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.

महिलांच्या सक्षमीकरणासाठी परिश्रम घेण्याची इच्छा असणार्‍यांनी राजकारणात प्रवेश केला पाहिजे. तेव्हाच महिलांच्या समस्यांची जाण येईल, असे सांगत राहुल गांधी यांनी 
महिला साधकांना राजकारणात प्रवेश करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांचे गुण वाढविण्यापुरतेच शिक्षण देण्यात येते, हे योग्य आहे का, असा प्रश्‍न एका शिक्षिकेने केला. उत्तर देताना राहुल म्हणाले, जादा  गुण मिळविणे हे एकच ध्येय असणे चुकीचे आहे. पाल्यांच्या कलागुणांना, कौशल्याला वाव देऊन त्यांचा विकास घडवून आणण्याकडे पालकांचे लक्ष असायला हवेे.

Tags :will give reservation to woman rahul gandhi belgaon news