Fri, Nov 16, 2018 08:55होमपेज › Belgaon › मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार येडियुराप्पाच का ?

मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार येडियुराप्पाच का ?

Published On: May 01 2018 1:15AM | Last Updated: Apr 30 2018 10:54PMबेळगाव : प्रतिनिधी

‘तरुणांचा पक्ष म्हणून सांगणार्‍या भाजप नेत्यांनी येडियुरप्पांसारख्या वयस्कर नेत्याला  मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून का ठरविले’ या एका विद्यार्थिनीनीने विचारलेल्या प्रश्‍नावर दिग्मूढ  होण्याची वेळ केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री  स्मृती इराणी यांच्यावर  आली.

केएलई सभागृहात शनिवारी भाजपच्यावतीने महिला जागृती संवाद कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आले होते. यावेळी एका विद्यार्थिनीने उपरोक्त प्रश्‍न ना. इराणी यांना विचारला. 

ना. इराणी म्हणाल्या, राजकारणातील मोठा अनुभव व राज्याचा विकास घडवून आणण्याची त्यांच्यातील योग्यता लक्षात घेऊन मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून त्यांना घोषित करण्यात आले. कोण वृध्द, कोण तरूण याचे पक्षाला काही देणे? घेणे असत नाही. येडियुरप्पा हे  विकासाचा ध्यास घेणारे असल्याने पक्षाला त्यांचे अधिक महत्व आहे.सिध्दरामय्या, राहुल गांधी  हे किती तरूण आहेत? असा प्रतिप्रश्‍न ना.इराणी यांनी केला.  

राहुल गांधी यांचे मित्र उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मतदारांना दिलेल्या आश्वासनांची पूतर्ता केली नाही. मात्र येडियुरप्पा हे आश्वसनाशी बांधील राहून कार्य करणारे आहेत.कनिष्ठ जातीतील सदस्यांना आरक्षण देण्याची गरजच काय? अशा एका विद्यार्थिनीच्या प्रश्‍नावर असमाधान व्यक्त करत ना. इराणी म्हणाल्या, कनिष्ठ जात असा शब्द वापरणे हेच मुळी चुकीचे आहे. हा शब्द वापरणे त्या जातीला तुच्छ लेखल्याचे  होणार आहे. उच्च, कनिष्ठ ही मन:स्थिती दूर होऊन प्रत्येकात सुधारणा होईतोवर आरक्षण देणे योग्यच ठरणार आहे.

विकासाच्या नावावर सिध्दरामय्या कुटिल राजकारण करत आहेत. जाती? धर्माच्या नावावर समाज फोडण्याचे काम करत असून याला युवावर्ग कदापि थारा देणार नाही, असेही ना. इराणी म्हणाल्या.