Sun, Nov 18, 2018 21:56होमपेज › Belgaon › पासपोर्ट केंद्राचे उद्घाटन मंगळवारी?

पासपोर्ट केंद्राचे उद्घाटन मंगळवारी?

Published On: Feb 06 2018 10:57PM | Last Updated: Feb 06 2018 10:43PMबेळगाव : प्रतिनिधी

बेळगावकरांच्या प्रतिष्ठेचा विषय बनलेल्या पासपोर्ट सेवा केंद्राचे 13 फेब्रुवारीला उद्घाटन होण्याची शक्यता आहे.मुख्य डाक कार्यालयाच्या दुसर्‍या मजल्यावर पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यात येणार आहे. कार्यालयाचे काम पूर्ण झाले आहे. आता उद्घाटनाची प्रतीक्षा आहे. अधिवेशनात असल्याने खा. सुरेश अंगडी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

14 जानेवारीला कडोली येथील मराठी साहित्य संमेलनात परराष्ट्र खात्याचे सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी दोन महिन्यांत पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले होते. मुख्य डाक कार्यालयाशी संपर्क साधला असता, यासंबंधीची काहीही माहिती आमच्याकडे आलेली नाही. यामुळे आम्ही अधिकृत काही सांगू शकत नाही. लवकरच केंद्र सुरू करण्यात येईल, असे डाकघर अधिकार्‍यांनी सांगितले.

वर्षभरापासून पासपोर्ट केंद्राची चलढकल सुरू आहे. यामुळे नागरिकांना अनेक अडचणी सहन कराव्या लागल्या आहेत. प्रसंगी हुबळीला हेलपाटे मारून पासपोर्ट बनवावा लागतो आहे. त्यासाठी 13 फेब्रुवारीला तरी केंद्राचे उद्घाटन करा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.