Thu, Apr 25, 2019 11:59होमपेज › Belgaon › ‘व्हॉट्सअ‍ॅप’ वापरावर निर्बंध आवश्यक

‘व्हॉट्सअ‍ॅप’ वापरावर निर्बंध आवश्यक

Published On: Jul 23 2018 1:07AM | Last Updated: Jul 23 2018 12:14AMबेळगाव : प्रतिनिधी

व्हॉट्सअ‍ॅप येणारे संदेशचे प्रमाण खूप आहे. मात्र काही संदेशातील मजकूर वादग्रस्त ठरत आहेत. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅडमिन अडचणीत येत आहेत. व्हॉट्सअ‍ॅपचे रुंपातर सायबर  क्राईममध्ये होत आहे. त्यामुळे व्हॉटसअ‍ॅपवरील नजर योग्य की अयोग्य, हा मुद्दा चर्चेला येत आहे.

स्मार्ट फोनची चलती, इंटरनेटची मुबलक सेवा, सर्वच व्यवहार ऑनलाईन यामुळे सर्वचजण मोबाईलला चिकटलेले असतात. मात्र, काही वेळा सोशल मीडियाचा गैरवापर होतो. त्याचा फटका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या अ‍ॅडमिनला बसून त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरुणाईमध्ये व्हॉट्सअपचा वापर लोकप्रिय प्रकार आहे. मात्र याचा वापर चांगल्या कामासाठी कमी व वाईट कृत्यासाठी जादा होत असल्याने समाजस्वास्थावर परिणाम होत आहे.  त्यामुळे व्हॉट्सअपवर निर्बंध आवश्यक आहे, अशा प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या.