होमपेज › Belgaon › एकी न झाल्यास आम्ही उमेदवार देऊ

एकी न झाल्यास आम्ही उमेदवार देऊ

Published On: Apr 23 2018 1:14AM | Last Updated: Apr 23 2018 12:46AMबेळगाव : प्रतिनिधी

येत्या 12 मे रोजी होणार्‍या विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक  विधानसभा मतदार संघात एकेक मराठी उमेदवार उभारण्यात यावेत, असे आवाहन सुरेश हुंदरे स्मृती मंचने रविवारी उपोषण आंदोलन छेडून केले. तसेच एकी न झाल्यास मंचतर्फे उमेदवारी जाहीर करण्यात येतील, असा इशाराही दिला. छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात स्मृतिमंचच्या वतीने उपोषण आंदोलन झाले. अध्यक्षस्थानी अ‍ॅड. राम आपटे होते. शिवपुतळ्याचे पूजन करून उपोषणाला सुरुवात झाली. 

स्मृतिमंचच्या वतीने काही दिवसांपासून एकीबाबत प्रयत्न सुरू आहेत. मात्र, नेत्यांकडून अपेक्षित प्रतिसाद लाभेनासा झाला आहे. त्याबाबत अ‍ॅड. राम आपटे म्हणाले, सीमावासीयांची लोकेच्छा कर्नाटक सरकारला दाखविण्याची गरज आहे. सर्व नेत्यांनी मराठी हितासाठी एकत्र यावे. त्यातून प्रत्येक मतदारसंघात एकेक उमेदवार देण्यात यावेत, अशी अपेक्षा ठेवण्यात आली आहे. एकीचे प्रयत्न यापुढेही केले जातील. मात्र, एकी न झाल्यास स्मृतिमंचच्या वतीने उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल. त्यांच्या पाठीशी जनतेने उभे रहावे.

एकीच्या पाईकांची भेट

एकीचे पाईक या गटाच्या कार्यकर्त्यांनी स्मृतिमंचच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यावेळी स्मृतिमंचने दुसर्‍या गटाशी चर्चा करण्यासाठी तयार असल्याचे स्पष्ट  केले. अ‍ॅड. किसन येळ्ळूरकर, राजेंद्र मुतकेकर, महादेव चौगुले, एन. बी. खांडेकर, नगरसेवक सर्वश्री राजू बिर्जे, विजय भोसले, माजी महापौर सरिता पाटील यांच्यासह अजित यादव, दिगंबर पवार, शिवाजी पट्टण, गोविंद राऊत, ईश्‍वर लगाडे, संजय मोरे, एम. वाय. घाडी, प्रदिप मुरकुटे, लक्ष्मण मेलगे, ए. ओ. येतोजी, युवराज हुलजी, एस. ए. पाटील, बाळाराम पाटील, वसंत म्हाळोजी, बाळासाहेब फगरे, रवी पाटील, आदी आंदोलनात सहभागी झाले होते.

Tags : Belgaum,  we, give,  candidate