होमपेज › Belgaon › मताला भाव पाचशेे ते हजार

मताला भाव पाचशेे ते हजार

Published On: May 10 2018 1:34AM | Last Updated: May 09 2018 9:13PMबेळगाव : प्रतिनिधी

ग्रामीण मतदारसंघात यावेळी तीन तगड्या उमेदवारामध्ये जोराची निवडणूक रंगणार आहे. यासाठी मते विकत घेण्याचा प्रकार जोरात सुरू असून मराठी मते विकत घेण्याचा प्रकार जोमात आहे. एका मताला पाचशेहे ते हजार रुपयापर्यंत पैशांचे वाटप करण्यात येत आहे. यामुळे सामान्य कार्यकर्ते चिंतेत सापडले असून पैशांचा होणारा वारेमाप वापर थांबविणार कसा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

स्वाभिमानी मराठी मतदार अशा आमिषांना बळी पडणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. बेळगाव ग्रामीण मतदारसंघात म. ए. समिती, भाजप व काँग्रेस अशी थेट लढत होणार आहे. यासाठी तिन्ही उमेदवारांचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. प्रचारच्या पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यात जोरदार प्रचार करण्यात आला. प्रचारामध्ये थेट आजी-माजी मुख्यमंत्र्यांनी सहभाग घेतला. यातून चुरस वाढली असून प्रत्येकाकडून एकेक मतदार जमविण्याचा प्रयत्न सुरू आहे.

सध्या काहीजणाकडून पैशाचा वारेमाप वापर करण्यात येत आहे. गावागावातील युवक आणि संघटनांवर लाखो रुपये खर्च करण्यात येत आहेत. युवकांची खास बडदास्त ठेवण्यात येत आहे. यामुळे युवकांची चंगळ आहे. 

पश्‍चिम भागातील मराठी मतदार फोडण्यासाठी सर्वप्रकारचे प्रयत्न काही जणांकडून होत आहेत. घरामध्ये असणार्‍या मताच्या संख्येनुसार पैशांचे वाटप करून मतांची याचना करण्यात येत आहे. यामुळे सावध होण्याची वेळ मराठी भाषिकावर येवून ठेपली आहे.