Sun, Apr 21, 2019 02:07होमपेज › Belgaon › सद्वर्तनी 79 कैद्यांची सुटका

सद्वर्तनी 79 कैद्यांची सुटका

Published On: Sep 10 2018 1:15AM | Last Updated: Sep 10 2018 1:15AMबंगळूर : प्रतिनिधी

राज्यातील सर्व कारागृहांमध्ये काही बदल करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री डॉ. जी. परमेश्‍वर यांनी सांगितले. परप्पन अग्रहार कारागृहात 79 कैद्यांना सद्वर्तनाच्या आधारे मुक्‍त करण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. हिंडलगा कारागृहातील आठ कैद्यांचा यात समावेश आहे.

2015 नंतर कोणत्याही कैद्याला सद्वर्तनाच्या आधारावर सोडण्यात आले नव्हते.  विविध कारागृहांमध्ये 14,500 कैदी आहेत. काही वर्षे शिक्षा भोगल्यानंतर त्यांना केलेल्या चुकीचा पश्‍चात्ताप होतो. अशा सद्वर्तनी कैद्यांची सुटका केली जात असल्याचे परमेश्‍वर म्हणाले. पोलिस महासंचालक नीलमणी राजू, कारागृह अतिरिक्‍त पोलिस महासंचालक मेघरिक  आदी उपस्थित होते.