Sun, Feb 17, 2019 05:51होमपेज › Belgaon › निपाणी जवळ अनोळखी व्यक्‍तीचा खून

निपाणी जवळ अनोळखी व्यक्‍तीचा खून

Published On: Jul 22 2018 10:47AM | Last Updated: Jul 22 2018 10:46AMनिपाणी : प्रतिनिधी

शहरापासून चार किलोमीटर अंतरावरील गवाणी रोडवर अनोळखी व्यक्‍तीचा खून झाल्याची घटना रविवारी सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आली. खून झालेल्‍या व्यक्‍तीचे वय 45 ते 50 असून धारदार शस्त्राने त्‍याच्या डोक्यावर वरमी घाव घालून हा खून केल्याचे स्‍पष्‍ट झाले आहे.

घटनाळी ग्रामीणचे फौजदार निंगनगौडा पाटील यांनी भेट देऊन तपास सुरु केला आहे. खून झालेली व्यकती कोल्हापूर जिल्ह्यातील असावी असा प्रथमिक अंदाज व्यक्‍त करण्यात येत आहे.