Thu, Apr 25, 2019 14:19होमपेज › Belgaon › बेळगावात तणाव दोन गटांत दगडफेक

बेळगावात तणाव दोन गटांत दगडफेक

Published On: May 16 2018 1:39AM | Last Updated: May 16 2018 1:45AMबेळगाव : प्रतिनिधी 

विजयोत्सव मिरवणुकीदरम्यान दोन गटांत प्रचंड दगडफेक झाल्याने शहरात मंगळवारी सायंकाळी तणाव निर्माण झाला.

दगडफेकीत वाहनांची मोडतोड करण्यात आली आहे. तर दोन ठिकाणी वाहने जाळण्यात आली. सायंकाळी काही कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. शहरात दि. 18  रोजी रात्री 2 पर्यंत जमावबंदीचा आदेश पोलिस आयुक्‍त चंद्रशेखर जारी केला आहे. दगडफेकीच्या घटनेत अनेक निष्पाप जखमी झाले आहेत.

तर एका महिलेसह दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.  उत्तर विधानसभा मतदार संघातील  भाजपचे उमेदवार अनिल बेनके यांच्या विजयोत्सवाची मिरवणूक काढण्यात  आली. मतमोजणी केंद्रापासून सुरु असलेली मिरवणूक मध्यवर्ती भागातील फुलभाग गल्‍लीतून फोर्ट रोडवर येताच देशपांडे पेट्रोल पंपजवळ कलाईगार गल्‍लीतून रॅलीवर दगडफेक करण्यात आली. यानंतर दोन्ही बाजूनी तुफान दगडफेक करण्यात आली.