Mon, Mar 25, 2019 09:07होमपेज › Belgaon › उज्ज्वलनगरमध्ये दोन गटांत हाणामारी

उज्ज्वलनगरमध्ये दोन गटांत हाणामारी

Published On: Sep 04 2018 1:16AM | Last Updated: Sep 04 2018 1:16AMबेळगाव : प्रतिनिधी

उज्ज्वलनगर येथे पूर्ववैमनस्यातून दोन गटांत झालेल्या हाणामारीत आजी व माजी नगरसेवकांसह  चार जण जखमी झाले आहेत. यामुळे उज्ज्वलनगर परिसरात तणाव निर्माण झाला आहे. माळमारुती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. 

मारामारीत  विद्यमान नगरसेवक मतीन निसारअहमद शेख (वय 36 रा. कोतवाल गल्‍ली) दानीश युसूफ चांदवाले (वय 25) जैफ युसूफ चांदवाले (वय 25 दोघे रा. जालगार गल्‍ली) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. तर माजी नगरसेवक फिर्दोस दर्गा यांच्या पाठीत चाकूने वार करण्यात आल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी खासगी इस्पितळात दाखल केले आहे.  

किरकोळ बाचाबाचीतून ही मारामारी झाली आहे. यामुळे दोन गटातील संघर्ष वाढला आहे. यापूर्वी दोन गटातील नेत्यांमध्ये वादावादी झाली होती. अनेक दिवसांपासुन वाद धुमसत होता. घटनेची माहिती मिळताच माऴमारुती पोलिस निरिक्षक चन्‍नकेशव टिंगरीकर व सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेउन पस्थितीवर नियंत्रण मिळविले आहे. रात्री उशिरापर्यंत दोन्ही गटातर्फे पोलिसात प्रकरण दाखल करण्याची प्रक्रिया  सुरु होती.