Wed, Apr 24, 2019 11:31होमपेज › Belgaon › बडे मासे दोन दिवसांत हाती

बडे मासे दोन दिवसांत हाती

Published On: Mar 15 2018 1:17AM | Last Updated: Mar 15 2018 1:17AMचिकोडी : प्रतिनिधी

बनावट नोटांप्रकरणी चिक्‍कोडी आणि रायबागमधून दोघांना अटक केल्यानंतर बडे मासे दोन दिवसांत हाती लागतील, असा विश्‍वास एनआयच्या पथकाने व्यक्‍त केला आहे. त्याद‍ृष्टीने मुधोळ, बागलकोट भागात तपास सुरू आहे.

बनावट नोटांच्या धंद्यात जिल्ह्यातील कांही बड्या व्यक्‍तींचा हात असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजते. बेळगाव जिल्ह्यासह जमखंडी, विजापूर, बागलकोट, मुधोळ आदी ठिकाणी तपास सुरू असून दोन दिवसांत मोठी कामगिरी फत्ते करू, असा विश्‍वास एनआयए पथकाने व्यक्‍त केला. 

चिकोडी छाप्यात सापडलेल्या 82 हजार रुपयांच्या नकली नोटा नेमक्या कोठून आल्या, त्या कुठे  छापण्यात आल्या, मुख्य केंद्र कोठे आहे,  कोणत्या बड्या व्यक्‍तीचा हात आहे, याची कसून तपासणी एनआयए पथकाकडून करण्यात येत आहे. कर्नाटकात आणखी कोठे ही टोळी कार्यरत आहे का, याविषयी चौकशी करण्यात येत आहे.