Mon, Nov 19, 2018 10:44होमपेज › Belgaon › ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Published On: Mar 01 2018 2:02AM | Last Updated: Mar 01 2018 2:00AMनिपाणी : प्रतिनिधी

पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर मांगूर फाट्यावर ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने एकजण ठार तर एक गंभीर जखमी झाला.

राजेंद्र शंकर गुरव (वय 36 रा.चिंचवडे, ता.करवीर) असे मृताचे नाव असून गंभीर जखमी कृष्णात निवृती चौगुले (25, रा. मरळी, ता. पन्हाळा) याच्यावर कोल्हापुरात खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बुधवारी दुपारी 2.30 च्या सुमारास हा अपघात झाला.

राजेंद्र व कृष्णात हे दोघे हमाली करत होते. तिघा मित्रांसमवेत फरशी उतरण्यासाठी ते संकेश्‍वरला गेले होते. काम आटोपून कृष्णातच्या दुचाकीवरून ते गावी परत जात  होते. मांगूर फाट्यावर  बेळगावहून कोल्हापूरकडे जाणार्‍या ट्रकने त्यांना मागून धडक दिली. रस्त्यावर आपटल्याने राजेंद्रचा जागीच मृत्यू झाला, तर कृष्णात गंभीर जखमी झाला. ट्रक दुचाकीवरून गेल्याने दुचाकीचाही चक्काचूर झाला. राजेंद्रने हेल्मेटही परिधान केले होते.

अपघाताची माहिती मिळताच पुजलॉईडच्या भरारी पथकाच एम. आर. घाटगे, पांडुरंग माने यांनी घटनास्थळी धाव घेतली.  कृष्णातला निपाणीच्या म. गांधी रुग्णालयात हलविले. 
घटनास्थळी हवालदार एन. एम. पुजारी, प्रकाश साबोजी, मस्ती यांनी भेट देऊन पंचनामा केला.

राजेंद्रच्या पश्‍चात आई, वडील, पत्नी, तीन मुली, भाऊ असा परिवार आहे. जखमी कृष्णातच्या दिलेल्या फिर्यादीनुसार ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.