Mon, Mar 18, 2019 19:19होमपेज › Belgaon › किणयेचा ट्रक वाहतूकदार तामिळनाडूत अपघातात ठार

किणयेचा ट्रक वाहतूकदार तामिळनाडूत अपघातात ठार

Published On: Dec 26 2017 1:32AM | Last Updated: Dec 26 2017 1:32AM

बुकमार्क करा

मच्छे : वार्ताहर 
किणये येथील विनायक ट्रान्स्पोर्ट कंपनीचे मालक वसंत गोविंद चव्हाण-पाटील (वय 71, रा. लक्ष्मी गल्ली किणये, मूळ पाटील गल्ली वडगाव-बेळगाव) यांचा  तामिळनाडूत  अपघाती मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री 9 वा. च्या सुमारास घडली आहे. 

मृत वसंत यांची ट्रान्स्पोर्ट कंपनी असून ते मुंबईहून-मदुराईला ट्रकने माल उतरविण्यासाठी गेले होते. परत येताना  तामिळनाडूतील एका ढाब्यावर रात्री 8 वा. जेवण करून रस्ता ओलांडून ट्रककडे येत 
असताना एका कारने त्यांना धडक दिल्याने ते जागीच ठार झाले. अपघातानंतर कारचालकाने पलायन केले; मात्र कार अडवून चालकाला ताब्यात घेण्यात आले.