Wed, Apr 24, 2019 01:32होमपेज › Belgaon › ऊसवाहू ट्रॅक्टरच्या धडकेत शिरगुप्पीचा दुचाकीस्वार ठार

ऊसवाहू ट्रॅक्टरच्या धडकेत शिरगुप्पीचा दुचाकीस्वार ठार

Published On: Dec 15 2017 2:43AM | Last Updated: Dec 15 2017 1:05AM

बुकमार्क करा

अंकली : प्रतिनिधी

ऊस वाहतूक ट्रॅक्टर व मोटारसायकल यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात मोटारसायलस्वार  शिरगुप्पी (ता. अथणी) येथील रहिवासी जाफर हबीब सनदी (वय35) ठार झाला. 
हा अपघात गुरुवारी सकाळी 11 वा. मांजरीवाडी (ता. चिकोडी) येथील येडूरवाडी क्रॉसजवळ झाला. या घटनेची नोंद अंकली पोलिस स्थानकात झाली असून अधिक तपास फौजदार वीरण्णा लट्टी करत 
आहेत. 

शिरगुप्पीहून मांजरीकडे येणार्‍या भरधाव ट्रॅक्टर चालकाचा ताबा सुटल्याने समोरून येणार्‍या मोटारसायकलस्वार जाफर हबीब सनदी याला जोराची धडक दिली. या धडकेत जाफर गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी घेऊन जात असता वाटेतच त्याचा मृत्यू झाला. ट्रॅक्टरचालक अपघातानंतर फरारी झाला आहे.