Sat, Jul 20, 2019 23:52होमपेज › Belgaon › सतर्कतेमुळे सापडली हरविलेली भावंडे

सतर्कतेमुळे सापडली हरविलेली भावंडे

Published On: Apr 18 2018 12:47AM | Last Updated: Apr 18 2018 12:24AMबेळगाव : प्रतिनिधी

मेणसे गल्ली येथे दुपारी बाराच्या सुमारास एक दोन वर्षाचे तर दुसरे तीन वर्षाचे बालक घाबरून रडत फिरत असताना गल्लीतील काही युवकांना दिसून आले. त्यांनी त्या मुलांची चौकशी सुरू केली. मात्र त्यांना ओळखणारे कोणीही सापडले नाही. यामुळे त्यांची छायाचित्रे सोशल मीडियावरून व्हॉयरल केली. त्यानंतर  काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे त्या मुलांना पालकांकडे सुपूर्द करण्यात आले.मेणसे गल्ली येथे मंगळवारी दुपारी सान्वी (3) व प्रवीण (2) ही मुले आढळून आली. भीतीमुळे रडत होती. त्यांची चौकशी विश्‍वनाथ मेणसे यांनी केली. परंतु त्यांना आपल्या पालकांची माहिती सांगता येईना. यामुळे त्यांची गोची झाली. 

दरम्यान, मुले सापडल्याची बातमी गल्लीत पसरली. काहींनी सापडलेल्या मुलांची छायाचित्रे व्हॉटसअप, फेसबुक, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून व्हायरल केली. यामुळे सर्वत्र खळबळ माजली.हरवलेल्या मुलांची चौकशी करण्यात येऊ लागली. इतक्यात हिरा टॉकीजमध्ये वॉचमन म्हणून कार्यरत असणार्‍या व्यक्तीने सदर मुलांना आपण ओळखत असून त्यांचे पालक शनिवार खूट येथे राहत असल्याची माहिती दिली. त्यानुसार संजय पाटील व टिळकवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांनी त्यांच्या पालकांचा शोध घेतला. 

त्याठिकाणी चौकशी करून त्यांच्याकडे मुले सुपूर्द केली.या मुलांचे पालक मूळचे मुधोळ येथील असून सध्या कामानिमित बेळगाव येथे वास्तव्याला आहेत. त्या मुलांचे वडील हिरा टॉकीजमध्ये कामाला असून ती मुले वडिलांबरोबर हिरा टॉकीजमध्ये गेली होती. ती खेळता खेळता मेणसे गल्लीत गेली. त्यानंतर ती हरवली. 

वडिलांनी टॉकीजमध्ये मुलांचा शोध घेतला. परंतु मुले सापडली नाहीत. यामुळे ते घाबरले होते. मात्र सामाजिक कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे हरविलेली मुले पालकांना मिळाली. यामुळे गर्भगळीत झालेल्या पालकांना दिलासा मिळाला. कार्यकर्त्यांनी दाखविलेल्या तत्परतेबद्दल पालकांनी त्या कार्यकर्त्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

Tags  tow broughts got alart ,belgaon news