Sat, Nov 17, 2018 18:41होमपेज › Belgaon › बेळगाव : टोमॅटो १ रुपया किलो

बेळगाव : टोमॅटो १ रुपया किलो

Published On: Feb 04 2018 1:50AM | Last Updated: Feb 04 2018 12:43AMबेळगाव ः प्रतिनिधी

आवक वाढल्याने घाऊक बाजारपेठेत टोमॅटोचा भाव प्र्रतिकिलो फक्त एक रु. झाल्याने शेतकर्‍यांना मोठा फटका बसला आहे. कृषी मालाला हमी भाव मिळावा, अशी मागणी करून शेतकरी संघटनांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात टोमॅटोचे मोफत वाटप केले. सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध नोंदविण्यात आला. टोमॅटोची सरकारनेच खरेदी करण्याची मागणी करण्यात आली. 

बाजारपेठेत भाजीपाल्याचे भाव घटल्याने शेतकर्‍यांना फटका बसला आहे. प्र्रति एकर टोमॅटो उत्पादनासाठी शेतकर्‍यांना 40 हजार रुपये खर्च आला. बाजारपेठेत केवळ एक रु. दराने खरेदी केली जात आहे. यामध्ये किरकोळ विक्रेते व दलाल मालामाल होत आहेत. शेतकरी पुन्हा कंगाल होत आहे. 

सरकारने शेतकर्‍यांच्या मागण्यांची दखल घेऊन उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. आता सरकारनेच टोमॅटोची खरेदी करून शेतकर्‍यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. 
मात्र किरकोळ विक्रेत्यांकडून टोमॅटोची 25 ते 30 रु. किलो विक्री केली जात आहे. यामध्ये दलाल व विक्रेते मालामाल होत आहेत. सरकारने शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे.  जिल्हाधिकारी कार्यालय आवारात ट्रॅक्टरची ट्रॉली भरून आणलेले टोमॅटो शेतकर्‍यांनी नागरिकांना मोफत वाटले. शेतकरी संघटनेचे नेते लिंगराज पाटील, शेतकरी नारायण पाटील, अखिला पठाण आदी उपस्थित होते.