Sun, Jul 21, 2019 16:12
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › पुणे-बंगळुरु महामार्गावर कार अपघात, तीन ठार 

पुणे-बंगळुरु महामार्गावर कार अपघात, तीन ठार 

Published On: Jan 02 2018 7:58AM | Last Updated: Jan 02 2018 7:57AM

बुकमार्क करा
निपाणी : मधुकर पाटील 

पुणे-बंगळुरु राष्‍ट्रीय महामार्गावर निपाणीजवळ कार अपघातात मुंबई विक्रोळी येथील तीन महिला ठार झाल्‍या तर, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. कार चालकाचा ताबा सुटल्‍याने कार झाडावर आदळून हा अपघात झाला. यात सावित्री गुप्ता (वय, ४७), शोभा गुप्ता (वय, २६) आणि आरती गुप्ता (वय २१) यांचा मृत्‍यू झाला. तर, निलेश गुप्ता (वय, २७), रवि गुप्ता (वय, २३) व चालक (सुर्य साउ (वय, २९) हे गंभीर जखमी झाले. जखमींवर कोल्‍हापूर येथील खासगी रूग्‍णालयात उपचार सुरु आहेत. 

अपघातात ठार झालेले सर्व जण एकाच कुटुंबातील असून, हे सर्व जण गोव्यात ३१ डिसेंबर साजरा करून मुंबईला परतत असताना मंगळावारी पहाटे तीनच्या सुमारास हा अपघात झाला. चालक सुर्य साउ याचा कारवरील ताबा सुटल्‍याने कार (क्र. एम. एच. ०१, ५११०) रस्‍त्‍याकडेला असणाऱ्या झाडावर आदळली. यात सावित्री यांचा जागीच मृत्‍यू झाला तर, शोभा आणि आरती यांचा उपचारासाठी रूग्‍णालयात घेवून जात असताना वाटेत मृत्‍यू झाला. अपघात एवढा भीषण होता की, कारचा चक्‍का चूर झाला आहे. 

घटनेची माहिती मिळताच भरारी पथकाचे निरीक्षक आण्णाप्पा खराडे, परशराम बागणे, मलाप्पा रेवणावळे आणि फौजदार  शिशिकांत शार्मा यांनी घटनास्‍थळी धाव घेत मदत कार्य केले.