Thu, Apr 25, 2019 15:25होमपेज › Belgaon › खानापूर : प्रभुनगरजवळ अपघातात तीन तरुण ठार

खानापूर : प्रभुनगरजवळ अपघातात तीन तरुण ठार

Published On: Jun 24 2018 1:34PM | Last Updated: Jun 24 2018 1:34PMखानापूर : प्रतिनिधी

बेळगाव-खानापूर रस्त्यावरील प्रभूनगरजवळ दुचाकीच्या अपघातात तीन तरुण जागीच ठार झाले. दुचाकी व इंडिका कारची धडक दुपारी पावणे बाराच्या दरम्यान झाली.अपघातातील मृतांची ओळख अद्याप पटली नाही.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, तीन तरुण एमएच  14 एफ एन 6699 या अ‍ॅक्टिव्हा दुचाकीवरून खानापूरहून बेळगावच्या दिशेने जात होते. यावेळी इंडिकाला धडकून अपघात झाला. ही धडक इतकी जोरदार होती की अपघातात तरुणांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच वडगाव ग्रामीण पोलीस निरीक्षक नारायण स्वामी घटना स्थळी पोहोचले. दरम्यान अपघातामुळे वाहतूक ठप्प झाली होती.

आठवडाभरापूर्वी रमजानच्या दिवशी गुंजीनजीक अपघातात दुचाकीवरील तिघा तरुणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आठ दिवसातच घडलेल्या या भरधाव कार आणि दुचाकीच्या धडकेत तिघा तरुणांना जीव गमवावा लागल्याने खानापूर व बेळगाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.