होमपेज › Belgaon › बेळगाव: अपघातात तीन युवक जागीच ठार

बेळगाव: अपघातात तीन युवक जागीच ठार

Published On: Jun 16 2018 1:34PM | Last Updated: Jun 16 2018 1:34PMखानापूर (बेळगाव) : प्रतिनिधी

बेळगावमधील खानापूरातील गुंजीनजीक मोटार सायकल आणि ट्रकचा अपघात झाला. या अपघातात तीन युवक जागीच ठार झाले. रमजान दिवशी घडलेल्या घटनेने खानापूरात हळहळ व्यक्त होत आहे. 

लोंढा येथून रमजान सणाचा बाजार करून परतणाऱ्या तीघा तरुणांच्या दुचाकीची थांबलेल्या ट्रकला धडक बसून झालेल्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले. शुक्रवारी रात्री  11.30 च्या सुमारास लोंढा खानापूर मार्गावरील गुंजी नजीक हा अपघात घडला. या अपघातात करीम शेख (वय 30), शानुर शेख (वय 24) दोघेही राहणार गुंजी रेल्वे स्थानक व पुंडलिक कोट्टलगी (वय  28) रा. हलकी सवदत्ती अशी ठार झालेल्यांची नावे आहेत.

हे तिघेही गुंजी रेल्वे स्थानकावर चहा व खाद्यपदार्थांची विक्री करण्याचा व्यवसाय करत होते. रमजान सणाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या अपघाताने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.