Thu, Jul 18, 2019 04:05होमपेज › Belgaon › जनरेटर चोरणारी टोळी निपाणीत गजाआड 

जनरेटर चोरणारी टोळी निपाणीत गजाआड 

Published On: Jul 29 2018 1:20AM | Last Updated: Jul 29 2018 12:26AMनिपाणी : प्रतिनिधी

लग्नसभारंभासह औद्यौगिक वापरासाठी येणारे जनरेटर चोरणार्‍या आंतरराज्य टोळीतील पाचजणांना निपाणी बसवेश्‍वर चौक पोलिसांनी शनिवारी सायकांळी अटक केली. यातील एकजण अल्पवयीन असून अटकेतील पाचही जण निपाणी, अकोळ व गोरंबे(ता.कागल) येथील रहिवाशी आहेत. चोरलेले जनरेटर व दोन वाहने असा 8 लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

दिगंबर रंगराव वास्कर (वय 24 रा.गोरंबे,  ता.कागल),  केदार रमेश कुंभार  (वय 30 रा.घट्टे गल्ली, निपाणी), निखिल अशोक शेटके (वय 19) व राजू भरत अरभावे (वय 28 दोघेही रा.अकोळ) यांच्यासह अल्पवयीन एकजण यांना अटक झाली आहे.  सीपीआय भरणी म्हणाले, पाचजणांनी केवळ चैनीखातर काहीतरी चोरण्याचा कट रचला. त्यातून या चोर्‍या घडल्या. 

भिवशी येथील मंडप व्यावसायिक सुधाकर  पाटील यांनी आपला 4 लाख रूपये किंमतीचा जनरेटर लखनापूरजवळ दीपक कोरडे(रा.निपाणी) यांना गेल्या दोन महिन्यांपूर्वी भाडयाने दिला होता.  दीपक यांनी तो जनरेटर आपल्या शेडमधील  प्रिटींग विभागाला दिला होता.  संशयीत दिगंबर याचाही मंडप डेकोरेशनचा व्यवसाय होता.त्याची सासरवाडी नांगनूर.के.एस,(ता.हुक्केरी) असल्याने कायमच या भागात त्याची ये-जा होती.त्यानुसार दिगंबरने आपल्या अल्पवयीन मेहुण्याच्या संगतीतील इतर तिघांना जाळयात ओढीत तो  जनरेटर चोरून नांगनुर के.एस. येथे ठेवला. तसेच तो विकण्यासाठी गिर्‍हाईकाचा शोध चालविला. जनरेटरला तिलारीनगर ता.आजरा येथे मागणी असल्याने त्याने पाचजणांच्या मदतीने तो तिलारीनगर येथे विकत असताना  व्यावसायिक खबर्‍याने जनरेटरचे मूळ मालक सुधाकर याच्याशी संपर्क साधला. नंतर पोलिसांना माहिती मिळाली.  त्यानुसार भरणी यांनी सहाय्यक फौजदार प्रकाश बनहट्टी, एस.एस.जाधव,डी.बी.कोतवाल, हावलदार शेखर सोदे,एम.एम.जंबगी,नितीन बडीगेर,एम.ए.तेरदाळ यांच्या मदतीने वरील पाचही जणांना तिलारीनगर येथून शुक्रवारी सायंकाळी ताब्यात घेतले. शनिवारी त्यांच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करून पाचही जणांना निपाणी न्यायालयापुढे हजर केल्याची माहिती सीपीआय भरणी यांनी दिली.