Sat, Jul 20, 2019 21:18होमपेज › Belgaon › बेळगाव : रात्रीत 3 मंदिरांत चोर्‍या

बेळगाव : रात्रीत 3 मंदिरांत चोर्‍या

Published On: Jul 18 2018 1:53AM | Last Updated: Jul 18 2018 1:20AMबेळगुंदी : वार्ताहर

बेकीनकेरे येथे भव्य मंदिरात चोरीची घटना ताजी असतानाच सोमवारी रात्री बेळगुंदी व सोनोली येथे तीन मंदिरे फोडून सुमारे 1 लाख रुपयांच्या ऐवजावर चोरट्यांनी डल्‍ला मारला.

बेळगुंदी गावच्या मध्यभागी असलेल्या ग्रामदैवत रवळनाथ मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम चालू असल्याने शेजारीच छोटेशे मंदिर उभारण्यात आले आहे. श्री रवळनाथाच्या मूर्तीवर चांदीचा हार आणि चांदीचाच मुखवटा होता. त्यापैकी चांदीचा हार चोरट्यांनी पळवला. ही चोरी दरवाजाची कडी तोडून करण्यात आली. तर चार वर्षांपूर्वी तीन कोटी रुपये खचूर्न जिर्णोद्धार केलेल्या लक्ष्मी मंदिराच्या दरवाजाची कडी-कोयंडा तोडून देवीच्या गळ्यातील सोन्याचे गंठण, चांदीची जोडवी व येडणे आदी दागिने चोरट्यांनी लांबविले. गावचे पुजारी नामदेव गुरव हे नेहमी पहाटे सर्व देवतांची पूजा करतात. ते पूजेसाठी गेले असता या घटना उघडकीस आल्या. 

सोनोली गावचे देवस्थान दुर्गाडी मंदिरातही सोमवारी रात्री दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी दानपेटीच चोरुन नेली. दुर्गाडी देवीची मंगळवार व शुक्रवार अशी आठवड्यातू दोनवेळा यात्रा भरते.  त्यामुळे या मंदिरात दानपेटीत मोठ्या प्रमाणात दान केले जाते. 

घटनेची माहिती मिळताच आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी भेट देऊन पाहणी केली व वडगाव ग्रामीण पोलिसांना घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले. घटनेची नोंद वडगाव ग्रामीण पोलिसात झाली असून पोलीस तपास करीत आहेत.

चोर्‍यांबद्दल ग्रामस्थांत आश्‍चर्य

मुखवटा न चारता केवळ चांदीचा हार चोरला तसेच बेळगुंदीत लक्ष्मीच्या दोन मूर्ती आहेत. त्यापैकी केवळ मोठ्या मूर्तीच्या दागिन्यांची चोरी झाल्याने ग्रामस्थातून आश्‍चर्य व्यक्‍त करण्यात येत आहे.