Wed, Sep 26, 2018 18:06होमपेज › Belgaon › सीमाभागातील शेतकर्‍यांचा ऊस महाराष्ट्रात

सीमाभागातील शेतकर्‍यांचा ऊस महाराष्ट्रात

Published On: Jul 10 2018 1:01AM | Last Updated: Jul 10 2018 12:24AMबेळगाव : प्रतिनिधी

सीमाभागातील शेतकरी कर्नाटकातील साखर कारखानदारांच्या  बिल समस्येला कंटाळून महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना ऊस देे पसंत करीत आहेत. गत गळीत हंगामात सीमाभागासह कर्नाटकातून सुमारे 25 हजार टन ऊस महाराष्ट्रातील कारखान्यात गेला आहे. यापैकी बेळगाव जिल्ह्यातील 15 टन हजार ऊस हेमरस ऊर्फ ओलम साखर कारखान्यात घालण्यात आला आहे. चार वर्षापासून बेळगाव जिल्ह्यातील 37 साखर कारखान्यांपैकी 17 कारखानदारांनी शेतकर्‍यांची ऊस बिले थकविली आहेत. त्याची रक्कम 568 कोटीच्या घरात होती. आता 139 कोटीच्या घरात आहे. चार वर्षापासून बिलाच्या प्रतीक्षेत थांबण्यापेक्षा महाराष्ट्रातील कारखानदारांना ऊस देणे पसंत केले आहे. त्यामुळे गत गळित हंगामात कर्नाटकमधून सुमारे 25 हजार टन ऊस महाराष्ट्रातील साखर कारखान्यात गेला आहे. 

कर्नाटकाच्या तुलनेत उसाला प्रतिटन 3000 हजार रु. दर महाराष्ट्रातील कारखाने देत असल्याने व व्यवहाराला चोख असल्याने सीमाभागातील शेतकरी चंदगड तालुक्यातील कारखान्याला ऊस पाठवत आहेत. महाराष्ट्रातील कारखानदारांनी 15 डिसेंबर 2017 पूर्वी प्रतिटन 3000 रु. दर दिला. त्यानंतर 2620 प्रमाणे दर दिला असून उर्वरीत 380 रु. प्रतिटनाप्रमाणे ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात देण्यात येणार आहे. कर्नाटकात प्रतिटन 2500 रु. दर देण्यात आला असून उर्वरीत 270 रु. तोडणी खर्च कारखानदारांनी देणे बाकी आहे.2004 सालातील ब्रम्हनाथ चवलगी (रा. कमशीनकोप) 3,6,404, रुद्राप्पा बरबुरकर (रा. देवलत्ती) 1,81,054, महादेव प्रभूकर (रा. देवलत्ती) यांना 2,92,307 इतके बिल साखर कारखानदाराकडून येणे बाकी आहे. याच शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दयामरणाचा अर्ज दिला होता.