Wed, Sep 26, 2018 12:11होमपेज › Belgaon › ‘ग्लोब’जवळ कारला अचानक आग

‘ग्लोब’जवळ कारला अचानक आग

Published On: Dec 29 2017 1:35AM | Last Updated: Dec 29 2017 12:09AM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

ग्लोब चित्रपटगृहासमोर अचनाक आग लागून कारचा समोरचा भाग जळून खाक झाल्याची घटना बुधवारी रात्री 8.30 च्या दरम्यान घडली. चालकाच्या प्रसंगावधनाने अनर्थ टळला. 

महाराष्ट्र पासिंग असलेली कार ग्लोब चित्रपटगृहाजवळ येताच अचानक बोनेटमधून धूर येत असल्याने चालकाने कार बाजूला घेतली. अधिक धूर आल्याने चालकाने तत्काळ वाहनातील व्यक्‍तींना बाहेर काढले. इतक्यात वाहनाच्या समोरील भागाने पेट घेतला. आगीचा भडका उडाल्याने वाहतूक पोलिसांनी रस्त्यावरील वाहतूक बंद करून अग्‍निशमन दलाला पाचारण केले. अग्‍निशमन दलाने घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली. एमएच 10 सीए 2970 असा या कारचा क्रमांक आहे.