Sat, Jul 20, 2019 12:55होमपेज › Belgaon › मानधनातून विद्यार्थ्यांचा गौरव

मानधनातून विद्यार्थ्यांचा गौरव

Published On: Sep 06 2018 1:40AM | Last Updated: Sep 05 2018 11:38PMबेळगाव : प्रतिनिधी  

वर्षभरात वेगवेगळ्या ठिकाणी दिलेल्या व्याखानातून जमा झालेले मानधन व आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी मिळालेल्या रकमेच्या व्याजातून जमा झालेल्या पैशातून गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना रणजित चौगुले या उपक्रमशील शिक्षकाने 21 हजार रुपयांचे शैक्षणिक साहित्याचे वितरण केले. 

सरकारी सरदार्स हायस्कूलमधील सहायक शिक्षक रणजित चौगुले हे उत्तम वक्‍ते आहेत. प्रयोगशील शिक्षक म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांनी 2017-18  शैक्षणिक वर्षांमध्ये विविध ठिकाणी दिलेल्या व्याख्यानांच्या मानधनाचा सदुपयोग करत शिक्षक दिनाच्या निमित्ताने गरजू विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वितरण केले. चौगुले यांनी गेल्या वर्षभरात विविध ठिकाणी व्याख्याने,  एसएसएलसी व्याख्यानमालेत सहभाग घेतला होता.   

त्यातून त्यांना जवळपास सहा हजार रुपये मानधन मिळाले होते. शिक्षक दिनाच्या निमित्ताने सदर मानधनातून सरदार्स शाळेतील ज्या क्रीडापटूनी शाळेला कॅम्प क्लस्टरमधून विजेतेपद मिळवून दिले, त्या क्रीडापटूंना कंपास बॉक्स व पॅडचे वाटप केले. लाभ  45 विद्यार्थ्यांना झाला.

बुधवारी मुख्याध्यापक जे.एच. तम्मण्णावर व शिक्षकांच्या हस्ते  वस्तूंचे वाटप केले. चौगुले यांंना चार वर्षांपूर्वी उगार खुर्द येथील रामतीर्थकर स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला होता. सदर रक्कम ठेव स्वरूपात ठेवली असून त्या रकमेच्या व्याजातून  जोयडा तालुक्यातील धनगर गवळी समाजातील 100 विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच वह्यांचे वाटप केले.