Sat, Jul 20, 2019 23:20होमपेज › Belgaon › निवडणूक कामासाठी घेणार विद्यार्थ्यांची मदत

निवडणूक कामासाठी घेणार विद्यार्थ्यांची मदत

Published On: Apr 24 2018 1:05AM | Last Updated: Apr 23 2018 8:46PMबेनाडी : वार्ताहर

12 मे रोजी होणार्‍या विधानसभेच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने कडक नियमावली केली असून यावर्षीच्या निवडणुकीत वृद्ध आजारी, दिव्यांग मतदारांना मतदान के्ंरदावर सहाय्य करण्यासाठी माध्यमिक शाळेतील 8 ते 10 पर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांची मदत घेण्यात येणार आहे.

यासंदर्भातील आदेश निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी गटशिक्षणाधिकार्‍यांना कळविला आहे.. त्यानुसार गटशिक्षणाधिकार्‍यांनी आपल्या कार्यक्षेत्रात येणार्‍या सर्व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक व लिपीक यांना या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी 8 वी ते 10 मधील विद्यार्थ्यांची नावे गटशिक्षणाधिकार्‍यांना कळविण्यात आली आहेत. 

निवडणूक आयोगाच्या या  नव्या धोरणानुसार मतदान केंद्रातील प्रत्येक बुथवर दोन विद्यार्थी तैनात करुन मतदारांना मतदान केंद्राच्या खोलीपर्यंत पोहचविणे व मतदानानंतर बाहेर सोडणे तसेच मतदारांसाठी पाण्याची व्यवस्था करणे आदी कामे देण्यात येणार आहेत.याशिवाय मतदान केंद्रापासून 1 कि.मी. अंतरापेक्षा जास्त अंतरावर मतदाराचे घर असल्यास त्यांच्यासाठी चारचाकी वाहनाची व्यवस्था केली जाणार आहे. यामुळे राजकीय पक्षातर्फे मतदारांची होणारी वाहतूक व मतदान केंद्रावर वाहनांची व त्यांना सहाय्य करणार्‍या पक्षाच्या कार्यर्त्यांची वर्दळ कमी होणार आहे.

 

Tags : belgaon, belgaon news, Karnataka Assembly Elections, students Help,