Tue, Feb 19, 2019 14:11होमपेज › Belgaon › चंद्रकांत पाटलांच्या घरासमोर उद्या सीमावासीयांचे धरणे

चंद्रकांत पाटलांच्या घरासमोर उद्या सीमावासीयांचे धरणे

Published On: Jan 22 2018 2:55PM | Last Updated: Jan 22 2018 3:00PMबेळगाव : प्रतिनिधी

सीमाभाग समन्वय मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गायलेल्‍या कन्नड गाण्याला विरोध दर्शविण्यासाठी उद्या कोल्हापुरात मंत्री पाटलील यांच्या घरासमोर निषेध नोंदविण्यात येणार आहे. त्यासाठी सीमा भागातील युवकांनी पुढाकार घेतला आहे. 

मंगळवारी सकाळी साडे सात वाजता  शिवाजी उद्यान येथे जमून त्‍याठिकाणापासून हे सर्व युवक कोल्हापूरला रवाना होणार आहेत. महाराष्ट्रातील नेते मनमानी वागतात व समितीतल्या एकीवर बोट ठेवतात. त्यामुळे समितीतील युवकांच्या माध्यमातून या कार्यक्रमात आपली एकी महाराष्ट्राला दाखवावी. असे आवाहनही युवकांनी केले आहे.