Sat, Feb 23, 2019 22:23होमपेज › Belgaon › चिकोडी बंद कडकडीत

चिकोडी बंद कडकडीत

Published On: Jan 09 2018 1:32AM | Last Updated: Jan 08 2018 10:03PM

बुकमार्क करा
चिकोडी : प्रतिनिधी

भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ येथील विविध दलित संघटनांनी सोमवारी पुकारलेला चिकोडी बंद शंभर टक्के यशस्वी ठरला. बंदमुळे जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले होते. नेहमी गजबजणारे बसस्थानक आणि बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला. सर्व प्रकारची दुकाने बंद ठेवून व्यापारी व विक्रेत्यानी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शाळा आणि महाविद्यालयेही विद्यार्थ्यांअभावी ओस पडली होती. 

विविध ठिकाणी दलित कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन टायर पेटवून आंदोलन छेडले. शहरातील पेट्रोलपंपही बंद असल्यामुळे दुचाकीस्वारांना इंधन मिळाले नाही.