Sun, Oct 20, 2019 12:13होमपेज › Belgaon › हिंदू कार्यकर्त्यांच्या हत्येतील आरोपींना त्वरित अटक करा

हिंदू कार्यकर्त्यांच्या हत्येतील आरोपींना त्वरित अटक करा

Published On: Dec 17 2017 1:30AM | Last Updated: Dec 16 2017 11:31PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

गेल्या दोन वर्षांपासून राज्यभरात आणि किनारपट्टी प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात 20 हून अधिक हिंदू कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आल्या आहेत. विविध हिंदुत्ववादी संघटनांमध्ये कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांचा हत्येचा तपास करण्यात राज्य सरकारला अपयश आले आहे. त्यासाठी हे सरकार तत्काळ बरखास्त  करण्यात यावे आणि खर्‍या आरोपींचा शोध घेण्यात यावा, या मागणीसाठी श्रीराम सेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन सादर करण्यात आले.

कर्नाटकामध्ये काँग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यानंतर केवळ दोन वर्षामध्ये हिंदू कार्यकर्त्यांच्या हत्या करण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी कारवार होन्नावर येथील  परेश मेस्ता या 18 वर्षीय युवकाचा खून करण्यात आला आहे. खुन्यांना राज्य सरकार पाठिशी घालत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी एस. झियाउल्ला यांना निवेदन देताना रमाकांत कोंडूसकर, रवि कोकीतकर आदी उपस्थित होते.