Sat, Jul 20, 2019 23:25होमपेज › Belgaon › नियमांचे उल्लंघन केल्यास सहा महिने शिक्षा

नियमांचे उल्लंघन केल्यास सहा महिने शिक्षा

Published On: Mar 09 2018 1:33AM | Last Updated: Mar 09 2018 12:09AMबेळगाव : प्रतिनिधी

निवडणुकीची आचारसंहिता जारी करण्यात आल्यानंतर प्रचारासाठी आवश्यक असणारी भित्तीपत्रके, पोस्टर्स प्रचारासाठी मुद्रित करताना प्रकाशकाचे नाव, पत्ता, मुद्रण प्रतींची संख्या त्याच्यावर नमूद करण्यात यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी झियाउल्ला एस. यांनी शहरातील प्रेस  ओनर्स असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांना केली. नियमांचे उल्लघंन करणार्‍यांना निवडणूक आयोगाच्या नियमानुसार सहा महिन्यांची शिक्षा देण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकार्‍यांनी दिला.

जिल्हाधिकारी कार्यालयात प्रेस ओनर्स असोसिएशनच्या झालेल्या बैठकीत ते बोलत होते. कोणत्याही व्यक्‍तीच्या निवडणूक प्रचारासाठी मुद्रण साहित्य प्रिंट करण्यासाठी दिल्यानंतर प्रकाशकाने घोषणापत्र घेणे आवश्यक आहे. प्रकाशकाने आपले नाव, पत्ता आणि सही असणारे घोषणापत्र दोघा साक्षीदारांच्या सहीनिशी घेणे आवश्यक आहे. प्रकाशकाकडून नियोजित घोषणापत्र घेतल्यानंतरच निवडणूक प्रचारासाठी आवश्यक असणारे प्रचार साहित्य निमावलीनुसार मुद्रित करण्यात यावेत, अशी सूचना जिल्हाधिकार्‍यांनी केली. निवडणूक प्रचारासाठी आवश्यक असणारे साहित्य मिुद्रत केल्यानंतर  प्रकाशकाच्या नावाने देण्यात आलेले घोषणापत्र आणि मिुद्रत केलेले प्रचार साहित्य जिल्हा निवडणूक आयुक्‍तांना देण्यात यावे. निवडणूक आयोगाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून नियमांचे उल्लंघन केल्यास सहा महिने शिक्षा व 2 हजार रू.दंड अथवा शिक्षा व दंड दोन्हीही करण्यात येईल, असे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले. यावेळी शहरातील विविध प्रिंटर्सचे प्रतिनिधी उपस्थित होते.