Mon, Jun 17, 2019 04:11होमपेज › Belgaon › पवारांच्या सभेला हजारोंच्या संख्येने या

पवारांच्या सभेला हजारोंच्या संख्येने या

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

खानापूर:वार्ताहर

सीमाप्रश्‍नाच्या सोडवणुकीसाठी अहोरात्र कष्ट घेणार्‍या कार्यकर्त्यांनी चळवळ जिवंत ठेवली आहे. त्याबरोबर मराठी भाषा आणि संस्कृतीचे रक्षण करण्याचा प्रयत्नदेखील प्राणपणाने झाला आहे. सद्या या लढ्याला बळकटी देण्यासाठी महाराष्ट्रातील नेतेही मोठ्या ताकदीने प्रयत्नशील आहेत. येत्या 31 तारखेला बेळगाव येथे होणार्‍या म.ए.समितीच्या सभेला माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद  पवार उपस्थित राहणार आहेत. या सभेला तालुक्यातील नागरीकांनी हजारोंच्या संख्यने उपस्थित राहा, असे आवाहन आ.अरविंद पाटील यांनी केले.

माळ अंकले येथे 31 रोजीच्या सभेची जागृती करण्यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यकर्त्यांनी जागृती पत्रके घरोघरी वाटली. 

मल्लाप्पा मोरे यांनी  प्रास्ताविक केले. तालुका म.ए.समितीत सद्या राष्ट्रीय पक्षातील युवक मोठ्यासंख्यने सहभागी होत आहेत. तालुक्यातील मराठी भाषकांनी एकीची वज्रमुठ अशीच ठेवून मेळावा बहुसंख्यने उपस्थित राहा. असे विचार जोतिबा पाखरे यांनी मांडले. बळीराम येळूरकर यांनीही भाषण केले.

यावेळी देवाप्पा गुरव, सुर्याजी पाटील, शंकर सावंत, मांडुरंग सावंत, रामू गुरव, पांडुरंग निट्टूरकर, अनंत चोपडे, विनायक गुरव, अनंत होसूरकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

जांबोटी भागात पत्रकांचे वाटप

 31 रोजीच्या सभेसंदर्भात जागृती करणारी पत्रके जांबोटी, पारवाड, कणकुंबी, बैलूर, कुसमळी, हब्बनहट्टी, ओलमणी, दारोळी आदी भागात वाटण्यात आली. यावेळी जांबोटी भागातील नेते, कार्यकर्ते मोठ्यासंख्यने उपस्थित होते. गोपाळ पाटील, शिवराज पाटील, पी.एच.पाटील, रामचंद्र खांबले, संजय पाटील आदींनी जागृती फेरीत सहभाग घेतला.


  •