Thu, Apr 25, 2019 21:23होमपेज › Belgaon › बेळगाव : चलो, सीपीएड मैदान

बेळगाव : चलो, सीपीएड मैदान

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

संपूर्ण सीमाभागाचे लक्ष लागून राहिलेल्या सभेसाठी ‘चलो सीपीएड मैदाना’चा नारा मध्यवर्ती म. ए. समितीने दिला आहे. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची दुपारी 3.30 वा. सीपीएड मैदानावर सभा होणार आहे. 

अध्यक्षस्थानी प्रा. एन. डी. पाटील राहणार असून त्यांच्यासह महाराष्ट्रातील अन्य नेतेमंडळी उपस्थित राहून मार्गदर्शन करतील. बेळगाव, खानापूर, निपाणी, बिदर, भालकी भागातून हजारो सीमावासी मेळाव्यात सहभागी होतील, असा अंदाज आहे.

सभेसाठी भव्य मंडप उभारण्यात आला असून भारतीय बैठक आणि खुर्च्यांची सोय करण्यात आली आहे.  सभेसाठी  युवकांवर वेगवेगळ्या जबाबदार्‍या सोपविण्यात आल्या आहेत. वाहनांची पार्किंग व्यवस्था सीपीएड मैदानाच्या समोरच्या बाजूला आणि ज्योती महाविद्यालयाच्या प्रांगणात केली आहे.  शरद पवार यांचे शनिवारी सकाळी 9 वा. सांबरा विमानतळावर आगमन होईल. सकाळच्या सत्रात पवार तुकाराम बँकेला भेट देतील, त्यानंतर मराठा मंदिरात विविध संस्थांचा सत्कार स्वीकारतील. पवारांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस गेल्या वर्षी झाला. त्यानिमित्त हा सत्कार होत आहे. 
सत्कारानंतर ते सीपीएडवर सभा घेतील. सीमावासीयांनी मोठ्या संख्येने सभेत सहभागी व्हावे, असे आवाहन मध्यवर्ती म. ए. समितीने केले आहे.
 


  •