Sat, Feb 16, 2019 06:46होमपेज › Belgaon › खानापूर रोडवरील अतिक्रमणावर हातोडा

खानापूर रोडवरील अतिक्रमणावर हातोडा

Published On: Jan 10 2018 1:56AM | Last Updated: Jan 10 2018 12:19AM

बुकमार्क करा
बेळगाव :  प्रतिनिधी

आरपीडी क्रॉस ते पिरनवाडी पर्यंतच्या अतिक्रमणावर मनपाच्या अतिक्रमण विभागाने मंगळवारी (दि.9) कारवाई केली. यावेळी मनपाचे महसूल अधिकारी चंद्रकांत पाटील, बी. वाय. सनदी, बी. उमेश, सागर कांबळे व कर्मचार्‍यांनी कारवाई केली. आरपीडी क्रॉस ते पिरनवाडीपर्यंत व्यापार्‍यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले होते. यामुळे पादचारी व वाहनधारकांना अनेक अडचणी येत होत्या. व्यापार्‍यांनी रस्ता व फुटपाथवर केलेल्या अतिक्रमणामुळे नाहक त्रास सहन करावा लागत होता. यावेळी फळ, कपडे, फुटवेअर, गॉगल, छोटी हॉटेल दुकाने आदी व्यापार्‍यांनी केलेले अतिक्रमण हटविण्यात आले. काही व्यापार्‍यांनी स्वताहून अतिक्रमन हटविले. 

सुमारे वर्षभरापूर्वी टिळकवाडी तिसरा रेल्वे गेट ते पिरनवाडीपर्यंतचा रस्ता डांबरीकरण करण्यात आला होता. तेव्हापासून रस्त्यावर व्यापार्‍यांकडून अतिक्रमण करण्यात आले होते. याची दखल घेत मनपाच्या अतिक्रमण हटाव विभागाने आज कारवाई केली. आज बुधवारी देशमुख रोडवरील अतिक्रमण हटविण्यात येणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.