Tue, Jul 23, 2019 07:17होमपेज › Belgaon › शाळा-कॉलेज प्रवेश प्रक्रिया पूर्ण 

शाळा-कॉलेज प्रवेश प्रक्रिया पूर्ण 

Published On: Jun 08 2018 1:21AM | Last Updated: Jun 08 2018 12:44AM
बेळगाव :
शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली असून कॉलेजची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली. शाळा गजबजण्यास सुरुवात झाल्या आहे. यंदा बारीवीचे वर्ग 2 मे तर अकरावीचे वर्ग 28 मे पासून सुरु झाले आहेत. प्राथमिक व माध्यमिक शाळा 28 मे पासून सुरु झाल्या असून विषय शिक्षकांनी अभ्यासक्रमाला सुरुवात केली आहे.

अकरावीची प्रवेश प्रक्रिया तीन टप्प्यात पूर्ण झाली. अखेरची यादी एक जून रोजी जाहीर झाली. यंदा दहावीचा निकाल चांगला लागल्याने विद्यार्थ्यांचा अकरावीत कल विज्ञान व वाणिज्य शाखेकडे दिसून आला. कला विभागात थेट प्रवेश घेण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. 28 मे पासून  प्राथमिक व माध्यमिक शाळा यंदा सुरु झाल्या. पहिल्या दिवशी खासगी शाळेत शिक्षक व विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. मात्र काही सरकारी शाळांत केवळ गुरुजींची शाळा भरली होती. तीस टक्के विद्यार्थ्यानी शाळेत उपस्थिती  दर्शविली. पहिली ते दहावीपर्यंतच्या शाळांचा 28 मे पासून प्रारंभ करण्यात आला. प्राथमिक शाळेत 29 पासून शैक्षणिक वर्ष सुरू झाले. खासगी शाळेत पहिल्या दिवसापासून शैक्षणिक अभ्यासक्रमाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

यंदादेखील शाळाप्रारंभी पुस्तके, गणवेश, बूट व सॉक्स मिळणार नसल्याची माहिती सरकारी शाळेतून देण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांना गतवर्षीच्या विद्यार्थ्याची जुनी पुस्तके घेऊनच शैक्षणिक वर्षारंभ करावा लागला. यंदा पुस्तके वेळेवर मिळणार नाहीत, याची कल्पना शिक्षकांना असल्याने शाळा सुट्टी पडायच्या अगोदर मुलांकडून पुस्तके जमा करून ती शाळेत  ठेवली होती. याचा उपयोग करुन शिकविण्यास प्रारंभ केला आहे.  जुन्याच गणवेशात प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांनी प्रवेश 
केला.