Tue, Jul 23, 2019 06:17होमपेज › Belgaon › गावातील मंदिरे ही संस्कार केंद्रे

गावातील मंदिरे ही संस्कार केंद्रे

Published On: Dec 19 2017 1:56AM | Last Updated: Dec 19 2017 12:53AM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

गावच्या विकासासाठी एकी महत्त्वाची असते. एकीतून विकासकामांचा डोंगर उभा करता येतो. यासाठी गावातील जनतेने एकत्र येऊन विचार करणे आवश्यक असते. गावकर्‍यांना एकत्र आणण्यात मंदिरांचा महत्त्वाचा वाटा असतो. यामुळे मंदिरे म्हणजे समाजाला घडविणारी संस्कार केंद्रे असतात, असे प्रतिपादन जि. पं. सदस्या सरस्वती पाटील यांनी केले.

अलतगा येथील गणेश मंदिराचा  11 वा वर्धापनदिन आयोजित करण्यात आला. त्यावेळी सरस्वती पाटील बोलत होत्या. अध्यक्षस्थानी नागेंद्र धुडूम होते.
गणेश मूर्तीला पिंटू जाधव, बाळू पाटील, नारायण पावशे यांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला. गोपाळ पाटील दाम्पत्याच्या हस्ते पूजा झाली. महाप्रसादाचे उद्घाटन सरस्वती पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. 
सरस्वती पाटील म्हणाल्या, धकाधकीच्या जीवनात माणसाच्या जीवनातून शांती हरपत चालली आहे. यामुळे समाज वाममार्गाला लागत असून त्यांच्यामध्ये परिवर्तन घडविण्याची ताकद मंदिरामध्ये आहे.
कंग्राळी ग्राम विकास कमिटीचे अध्यक्ष आर. आय. पाटील म्हणाले, कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धांना थारा न देता देवाची आराधना केल्यास प्रत्येकाला निश्‍चित यश मिळते. परंतु यासाठी प्रामाणिक प्रयत्नांची आवश्यकता असते. श्रद्धेमुळे माणसाला मानसिक शांतता मिळते. अंधश्रद्धतेतून माणसाचा विकास खुंटतो. यासाठी मंदिरातून समाजजागृतीचे कार्यक्रम हाती घ्यावेत.

प्रमुख पाहुणे म्हणून ग्रा. पं. अध्यक्षा लता पाटील, उपाध्यक्ष गणपत सुतार, सदस्य चेतक कांबळे, एच. एम. ताशिलदार, रमेश कोलकार, संतोष कडोलकर उपस्थित होते.

यानिमिताने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यलाप्पा कडोलकर, तुकाराम चौगुले, सोमनाथ आलोजी, गुंडू कदम, भैरू दळवी, रमेश पाटील, सुरेश घुग्रेटकर, आनंद जाधव, पुंडलिक पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रकांत धुडूम यांनी केले तर आभार पीतांबर पाटील यांनी मानले.