Fri, Apr 26, 2019 15:26होमपेज › Belgaon › चार गावातील पाच मंदिरात चोरी : लाखोचे दागिने लंपास

खानापूर तालुक्यात देवही बनले असुरक्षित 

Published On: Aug 05 2018 1:12PM | Last Updated: Aug 05 2018 1:12PMखानापूर :  प्रतिनिधी

नागरिकांच्या मालमत्ता व घरांपाठोपाठ तालुक्यातील मंदिरेही असुरक्षित बनली आहेत. काल रात्री नंजीनकोडल, जुंजवाड, सागरे, रंजनकोडी या गावातील पाच मंदिरांना चोरटय़ांनी लक्ष बनविले.

तीन किलो चांदी, पंधरा तोळे सोने लंपास 

नंजीनकोडल ता. खानापूर येथील भरवस्तीतील लक्ष्मी मंदिरात  धाडसी चोरीचा प्रकार घडला. नुकताच पार पडलेल्या यात्रेत जमा झालेले अंदाजे दिड किलोचे चांदीचे दागिने व आठ तोळे देवीची आभूषणे असा तीन लाखाचा ऐवज लंपास करण्यात आला आहे.

मंदिराचा लाकडी दरवाजा तोडून चोरटय़ांनी देवीच्या अंगावरील दागिन्यांची चोरी केली आहे. तिजोरी फोडता आली नसल्याने आतील ऐवज  हाती लागू शकला नाही. गावच्या मध्यभागी हे मंदिर आहे. पूर्व तयारीनिशी हा प्रकार तडीस नेण्यात आल्याचा अंदाज आहे.

एकाच टोळीचा हात असण्याची शक्यता 

जुंजवाड येथील लक्ष्मी मंदिरातील सोने चांदीचे दागिने, विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील मुर्तींवरील चांदीची किरीट तर सागरे व रंजनकोडी येथील मंदिरातही चोरीच्या घटना घडल्या आहेत. एकाच रात्रीत परिसरातील चार गावातील मंदिरामध्ये चोरी झाली असल्याने एकाच टोळीचा हात असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नंदगड पोलिस पुढील तपास करत आहेत.