Sun, May 19, 2019 22:43होमपेज › Belgaon › ग्रामीण दुग्ध व्यवसाय संकटात

ग्रामीण दुग्ध व्यवसाय संकटात

Published On: Jan 18 2018 1:48AM | Last Updated: Jan 17 2018 11:23PM

बुकमार्क करा
निपाणी : प्रतिनिधी 

दोन वर्षापासून दूध दरात वाढ झाली. दुभत्या जनावरांचे दरही भडकल्याने दूध उत्पादक व शेतकरीवर्गात असंतोष आहे. दुभते जनावर विकत घ्यायचे म्हणजे हत्ती विकत घेण्यासारखे आहे.
शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालनाकडे वळला आहे. जनावरांच्या किमती भरमसाट वाढल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. बाजारपेठेत विविध जातींच्या दुभत्या म्हशींच्या दरात सरासरी 20 ते 30 हजार रु. ची वाढ झाली आहे. यामुळे ग्रामीण दुग्ध व्यवसायासमोर संकट निर्माण झाले आहे. 

सहकारी दूध संस्थेकडून प्रतिफॅटप्रमाणे मिळणारा दर, पशुखाद्याच्या किमतीत झालेली वाढ, वैरणीचा प्रश्‍न असे  चित्र आहे. उत्पादन खर्चाच्या अधारे दुधाला अपेक्षित दर मिळत आहे. दुधाचा भाव कमी होता त्यावेळी चाराटंचाई भासू लागल्याने उत्पादन खर्चही निघत नव्हता. अनेकांनी दुभती जनावरे विकली. आता उलट स्थिती आहे. शेतजमीन असताना म्हशीच्या दुधाचा दर 7 फॅटला 40.30 रुपये तर विक्री 50 रुपये आहे. गायीच्या दूध खरेदीचा दर 3.5 फॅटला 20 रुपये इतका आहे. वाढीव दराने दुधाची खरेदी करावी लागत असल्याने अनेकजण दुभत्या जनावराची खरेदी करत असल्याचे सौंदलगा ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष पुंडलिक भेंडुगळे यांनी सांगितले.

आठवडी बाजारपेठेत खडकी म्हेैस दर 20 ते 25 हजार,  मुर्र्‍हा  30 ते 40 हजार, म्हैसाणा म्हैस 50 ते 60 हजार, अशा किमती आहेत. मंदीत दुभत्या जनावरांचे दर भडकले आहेत. बाजारभावाने दुधाला उत्पादित खर्चाच्या आधारे दर मिळत असल्याने म्हशी, गोपालनाकडे शेतकरी वळत आहे.

उन्हाळ्याचे दिवस असून  दुधाच्या उत्पादनातही  घट जाणवत आहे. दूध संघांचे संकलनही कमी होत आहे. शहरासह ग्रामीण भागातही दूधसंकलन केंद्रात मोठी वाढ झाली आहे. दुभत्या जनावरांची संख्या कमी होत असली तरी गायीने अथवा म्हैशीने पाड्याला अथवा रेडीला जन्म दिल्यास त्याची जपणूकही  चांगल्या प्रकारे केली जात आहे. यामुळे एरवी जनावरे पाळणे परवडत नसल्याचे कारण पुढे करून कत्तलखान्याकडे  होणारा जनावरांचा पुरवठा कमी झाला आहे. सीमाभागातील सर्व गावातून कर्नाटकपेक्षा महाराष्ट्रातील समृध्दी, गोकुळ, शाहू, वारणा, हुतात्मा या संघामध्ये दूध संकलनासाठी स्पर्धा आहे. सर्वाधिक दूध संकलन गोकुळ व शाहू या संघाकडे होत आहे.