होमपेज › Belgaon › ‘स्मार्ट सिटी’ अडकलीय खड्ड्यांत...

‘स्मार्ट सिटी’ अडकलीय खड्ड्यांत...

Published On: Jul 26 2018 1:31AM | Last Updated: Jul 25 2018 11:56PMबेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव शहराचा स्मार्ट सिटीत समावेश झाला. त्यासाठी दोन टप्प्यांत 400 कोटींचा निधीही दिला गेला. मात्र यंदाच्या पावसात बेळगावसह उपनगराची रस्त्याची चाळण झाली आहे. 

शहरात संचयनी सर्कल, बेळगाव खानापूर रोड, काँग्रेस रोड, गुरुवार पेठ, कलामंदिर रोड, शामाप्रसाद मुखर्जी रोड, शिवाजी गार्डन, हुलबत्ते कॉलनी, शास्त्री नगर, कपिलेश्‍वर कॉलनी, गांधीनगर ब्रीज, महात्मा फुले रोड, रविवार पेठ, कॅन्टोन्मेंट, भाजीमार्केट, फोर्ट रोड अशा जवळपास सार्‍यांची रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुऴे डबकी तयार होऊन त्यात पडून अपघात झाले आहेत. दोन दिवसांपूर्वीच खड्डा चुकवताना ट्रकने कारला धडक दिली.  असे किरकोळ अपघात रोजचेच आहेत. 

हे खड्डे महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम खाते बुजवणार का? गेल्या मार्चमध्ये केलेल्या रस्त्यांवर पहिल्याच पावसात इतके खड्डे कसे काय पडतात, याचा जाब इंजिनिअरना आणि अधिकार्‍यांना लोकप्रतिनिधी विचारणार का? की बेळगाव कागदोपत्रीच स्मार्ट राहणार?