Sun, Oct 20, 2019 11:24होमपेज › Belgaon › निपनाळच्या शेतकर्‍याची कर्जाला कंटाळून आत्महत्या

निपनाळच्या शेतकर्‍याची कर्जाला कंटाळून आत्महत्या

Published On: Dec 11 2017 1:27AM | Last Updated: Dec 10 2017 11:23PM

बुकमार्क करा

रायबाग : प्रतिनिधी  

विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या निपनाळ (ता.रायबाग) येथील शेतकर्‍याचा जिल्हा इस्पितळात शनिवारी मृत्यू झाला. महादेव भीमप्पा फडतरे (वय 60) असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे.
महादेव याने शेतीसाठी खासगी बँक व हातउसणे मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले होते. कर्ज भागविणे शक्य न झाल्याने त्याने गेल्या 15 नोव्हेंबर  रोजी विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. अत्यवस्थ महादेव याच्यावर जिल्हा इस्पितळात उपचार सुरू होते.  रायबाग पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे.