Sun, Aug 25, 2019 08:11होमपेज › Belgaon › बेळगावात ७,०२१ शिधापत्रिका वितरित

बेळगावात ७,०२१ शिधापत्रिका वितरित

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्यावतीने तत्काळ शिधापत्रिका वितरण सुरू आहे. शिधापत्रिका मिळविण्यासाठी वितरण केंद्रावर नागरिकांची झुंबड उडाली आहे. यामध्ये एजंटराज माजले असून शिधापत्रिका मिळवून देण्यासाठी पैसे उकळण्यात येत आहेत. 23 फेब्रुवारीपासून तत्काळ योजना सुरू असून आजपर्यंत 7021 शिधापत्रिकांचे वितरण झाले आहे .

राज्यात अनेक वर्षापासून शिधापत्रिका वितरणाचा घोळ सुरू आहे. शिधापत्रिकांसाठी वारंवार नियमावली बदलण्यात येते. याचा फटका सामान्य नागरिकांना बसतो. यामुळे अनेकांना शिधापत्रिकेपासून वंचित राहावे लागत आहे.  यामध्ये एजंटराज सुरू आहे. त्यांच्याकडून पाचशेहे ते हजार रुपये उकळण्यात येत आहेत. याला चाप लावण्याची आवश्यकता आहे.

शिधापत्रिका मिळविण्यासाठी नागरिकांकडून अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येत नाही.  अर्ज दाखल करण्यासाठी ऑनलाईन पद्धत अवलंबिण्यात आली आहे. अर्ज दाखल करण्यासाठी सायबर कॅफेकडून गरजूंची लूट करण्यात येत आहे. 50 ते 100 रु. इतके शुल्क अर्ज दाखल करण्यासाठी घेण्यात येत आहे. 

सध्या  वितरण केंद्रावर शिधापत्रिका मिळविण्यासाठी नागरिकांच्या रांगा सकाळपासून लाालेल्या असतात. त्यांना ताटकळत थांबावे लागत आहे. यामध्ये सुटसुटीतपणा येण्याची गरज आहे.शिधापत्रिका वितरण आचारसंहिता जाहीर होईपर्यंत सुरू राहणार आहे.


  •