होमपेज › Belgaon › म्हादईसाठी चर्चेस तयार : सिद्धरामय्या

म्हादईसाठी चर्चेस तयार : सिद्धरामय्या

Published On: Dec 23 2017 2:03AM | Last Updated: Dec 23 2017 12:25AM

बुकमार्क करा





रामदुर्ग : वार्ताहर

म्हादई योजनेच्या माध्यमातून कर्नाटकाला पाणी सोडण्यासाठी अनेक वेळा गोवा मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविण्यात आले आहे. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिलेला नाही. त्यांनी येडियुरप्पा यांना पत्र लिहून चर्चा करण्यास सहमती दर्शविली असेल तर कर्नाटक सरकारसुद्धा यासाठी तयार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले. 

रामदुर्ग तालुक्यातील गोडची येथे आयोजित साधना उत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. म्हादई पाणी वाटपावरून सुरू असलेला वाद चर्चेच्या माध्यमातून मिटविण्यासाठी अनेक वेळा गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना पत्र लिहिण्यात आले. त्यांनी यावर कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.  आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन भाजपने मतांसाठी ही खेळी पुढे केली आहे. मुख्यमंत्री पर्रीकर यांना भाजपने पत्र लिहिले आहे. मुख्यमंत्र्यांनी शिष्टाचाराचे उल्लंघन केले असले तरी आपण चर्चेसाठी तयार आहोत. गोवा मुख्यमंत्र्यांनी तारीख व ठिकाण ठरवावे, असे आवाहन त्यांनी केले.