Tue, Mar 19, 2019 03:13होमपेज › Belgaon › आला पावसाळा, वाढला धोका आजारांचा

आला पावसाळा, वाढला धोका आजारांचा

Published On: Jun 10 2018 1:47AM | Last Updated: Jun 09 2018 10:43PMबेळगाव : प्रतिनिधी

पावसाळा आला की दरवर्षी रुग्णांच्या संख्येत वाढ होते. परिसरातील दवाखान्यांत रुग्णांची गर्दी होते. हवामानातील बदलामुळे रोगराई झपाट्याने पसरते. पावसाळ्यात सूर्याची किरणे भुभागावर पडत नसल्याने जीवजंतू वाढतात. यामुळे रोगराई पसरते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे होणार्‍या आजारांचे प्रमाण सर्वाधिक असते. त्यामुळे वापरातील सर्व पाण्यावर किमान तुरटी फिरवून ते वापरावे. अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यासारखे आजार हे या दिवसात अधिक पसरतात. लहान मुलांना त्याची त्वरित लागण होते. पाऊस थांबल्यानंतर साचलेल्या पाण्यामुळे मलेरियाचा फैलावही अधिक होतो. 

पावसाळ्यात ठरावीक गोष्टीची काळजी घेतली तर आजाराची काळजी करावी लागणार नाही. पावसाळ्यात हिवताप होण्याचे प्रमाण अधिक असते. हिवताप हा प्रामुख्याने परिसरातील डांसामुळे होतो. यामुळे खबरदारी घेण्याची गरज आहे.

पावसाळ्यात लहान मुलांना सर्दी, खोकला, ताप, यासारख्या आजारांची लागण होते. तसेच हिवतापाच्या रुग्णांमध्ये वाढ होते. डासांची उत्पत्ती, जास्त झाल्याने रुग्णांमध्येही वाढ होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शहरात तापाने आजारी पडणार्‍यांची संख्या वाढते.  पावसाळ्यात आजाराची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. 

पावसाळ्यातील आजार 

पावसाळ्यात डास चावल्यामुळे हिवताप, मलेरिया 
दमट, गार ह वा आणि मंद पचनशक्ती यामुळे दम्याचा त्रास 
पावसाळ्यात दूषित पाणी पिल्यास जुलाब 
अंगावर जास्त वेळ ओले कपडे ठेवल्यास सर्दी -खोकल्यासारखे आजार
पावसाळ्यात चिकनगुनिया आजाराचा धोका  
अतिसार गॅस्ट्रो, कॉलरासारखे आजार अधिक पसरतात

उपाययोजना आणि प्रतिबंध

पावसात भिजणे टाळावे, भिजल्यास तात्काळ कपडे बदलावेत
उघड्यावरील पदार्थ खाऊ नये. घरातील अन्नपदार्थ झाकलेले असावेत 
पिण्याचे पाणी स्वच्छ भांड्यात झाकून ठेवावे 
आपले घर व परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा 
डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी प्रयत्न करावा 
आजारांची लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे

हवामानातील बदलामुळे पावसाळ्यात आजार उद्भवतात. यामुळे स्वस्तात मिळणारी फळे खाऊू नये.  ताप, सर्दी, खोकला, मलेरिया आदी आजार याकाळात अधिक दिसून येतात. पावसाळ्यात बहुतांश आजार डासांमुळे होतात. उघड्यावरील अन्‍नपदार्थ टाळावेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घ्यावेत.   - डॉ. सुचित्रा लाटकर, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन