Sun, Sep 23, 2018 20:31होमपेज › Belgaon › ‘टॉप इन टाऊन’ रेस्टॉरंटवर छापा

‘टॉप इन टाऊन’ रेस्टॉरंटवर छापा

Published On: Feb 19 2018 1:24AM | Last Updated: Feb 19 2018 1:24AMबेळगाव : प्रतिनिधी

शहराच्या मध्यवर्ती भागातील किर्लोस्कर मार्गावर असलेल्या टॉप इन टाऊन रेस्टॉरंटमध्ये बेकायदेशीर मद्यविक्री, ध्वनिप्रदूषण  आणि लॉजमध्ये वेश्या व्यवसाय चालविल्याच्या संशयावरून  खडेबाजार पोलिसांनी 11 जणांना अटक केली आहे. शनिवारी रात्री पोलिस आयुक्त डी. सी. राजाप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली लॉजवर छापा टाकून ही कारवाई करण्यात आली.

टॉप इन टाऊनच्या टेरेसवर बेकायदेशीर मद्यविक्री आणि वेश्या व्यवसाय चालल्याची माहिती पोलिस आयुक्तांना मिळाली होती. त्यानुसार शनिवारी रात्री उशिरा पोलिस आयुक्त राजाप्पा, उपायुक्त सीमा लाटकर, खडेबाजार पोलिस निरीक्षक यू. एच. सातनहळ्ळी, डीसीआयबीचे सीपीआय आर. बी. गड्डेकर यांनी टॉप इन टाऊनवर छापा टाकला. टॉप इन टाऊनच्या गच्चीत मोठ्या आवाजात स्पीकर लावून नाचगाणे सुरू असल्याचे त्यांना आढळले. शिवाय अबकारी कायद्याचे उल्लंघन करून मद्यविक्री केली जात होती, असे निदर्शनास आले.