Wed, Jul 24, 2019 12:45होमपेज › Belgaon › पक्ष बळकटीच्या कार्याला लागा

पक्ष बळकटीच्या कार्याला लागा

Published On: Dec 11 2017 1:27AM | Last Updated: Dec 10 2017 10:55PM

बुकमार्क करा

रायबाग : वार्ताहर 

मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्या सरकारने लोककल्याणाच्या  अनेक योजना हाती घेऊन तळागाळातील व्यक्तींपर्यंत पोहोचविल्या आहेत. कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्याची माहिती प्रत्येकाला देण्याबरोबरच पक्षाच्या विभाग पातळीवरील संघटनांना बळकटी मिळवून द्यावी, असे आवाहन राज्याचे सहकारमंत्री व जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी केले.

जारकीहोळी यांनी शुक्रवारी चिंचलीला भेट देऊन मायक्कादेवीचे दर्शन घेतले. यानंतर कार्यकर्त्यांशी ते बोलत होते. रायबाग व कुडची येथे यावेळी काँग्रेस उमेदवारांना विजयी करायचे असून प्रत्येक कार्यकर्त्याने  जबाबदारीने कार्याला लागावे. जनतेला काँग्रेस सरकारच्या कार्याची माहिती करून देऊन त्यांना पक्षात सामील करून घ्यावे, अशी सूचनाही  त्यांनी केली. 

आ. विवेक पाटील, काडा अध्यक्ष इरगौडा पाटील, नगरसेवक, एम. एम. रावनगोळ, झाकीर तरडे, तम्माणी वड्डर, लक्ष्मण काराकायी, अशोक बनगे, नानासाब सौंदलगी, अजित पाटील, कुमार हारुगेरी, रामचंद कांबळे, सुल्तान हेगडे, अझरुद्दीन मुल्ला, प्रभू मांग, विलास बसनाईक यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. ना. जारकीहोळी योनी रायबाग येथे पक्ष कार्यालयाला भेट देऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.