Thu, Apr 25, 2019 15:24होमपेज › Belgaon › सतीश जारकीहोळींकडून हेलिकॉप्टर खरेदी

सतीश जारकीहोळींकडून हेलिकॉप्टर खरेदी

Published On: Feb 15 2018 1:55AM | Last Updated: Feb 14 2018 9:51PMबेळगाव : प्रतिनिधी     

अ. भा. काँग्रेसचे सचिव, यमकनमर्डीचे आ. सतीश जारकीहोळी यांनी हेलिकॉप्टर खरेदी केले आहे. याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात होत आहे. आ. जारकीहोळी यांनी अमेरिकेच्या बेल कंपनीकडून हेलिकॉप्टर खरेदी केले असून त्याचा वापर सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमासाठी ते  करणार आहेत.

हेलिकॉप्टर खरेदी करणार असल्याचा मनोदय  आ. जारकीहोळी यांनी गेल्या 6 डिसेंबर रोजी बेळगाव येथे झालेल्या ‘अंधश्रध्दाविरोधी संकल्प’ कार्यक्रमात व्यक्त केला होता. जारकीहोळींनी खरेदी केलेल्या हेलिकॉप्टरला दोन इंजिन व 6 आसने आहेत.

आठ हेलिपॅड  

हेलिकॉप्टर उतरविण्यासाठी जिल्ह्यामध्ये आठ  हेलिपॅड उभारण्यात आले आहेत. हुनश्याळ (ता. गोकाक), हुदली (ता. बेळगाव) येथील आ. जारकीहोळी यांच्या मालकीच्या साखर कारखाना आवारात, गोकाक येथे दोन, हुक्केरी तालुक्यातील  अलबाळ, पाच्छापूर, यमकनमर्डी तसेच बेळगाव येथे कुमारस्वामी लेआऊट येथे असे एकूण आठ हेलिपॅड उभारले आहेत.

साखर कारखान्याशी संबंधित कामे, राज्यामध्ये विस्तार करण्यात येत असलेल्या मानवबंधुत्व मंचच्या कामासाठी तसेच राजकीय कार्यासाठी हेलिकॉप्टरचा उपयोग  करणार आहेत. आ. जारकीहोळी यांना अ. भा. काँग्रेसचे सचिवपद मिळाल्यानंतर तेलंगणाचे काँग्रेसचे प्रभारीपद देण्यात आले आहे. या सर्व जबाबदार्‍या वेळेत पूर्ण करणे महत्तवाचे आहे. यासाठी हेलिकॉप्टर खरेदी केल्याची माहिती आ. जारकीहोळी यांच्या नातेवाईकांनी दिली.