Sat, Jan 19, 2019 10:11होमपेज › Belgaon › ट्रेलरला आग

ट्रेलरला आग

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

पुणे-बंगळूर महामार्गावर भूतरामहट्टी येथे राणी चन्नम्मा विद्यापीठ क्रॉसजवळ पोकलँडची वाहतूक करणार्‍या ट्रेलरला (अवजड वाहतूक करणारे वाहन)अचानक आग लागल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. 

कोल्हापूरहून बंगळूरकडे पोकलँड घेऊन जाणार्‍या ट्रेलरने अचानक पेट घेतला. ट्रेलरच्या इंजिनमधून धूर येत असल्याने चालकाने वाहन थांबवले. तितक्यात वाहनाने अचानक पेट घेतला. यामध्ये वाहनाच्या समोरील बाजूचे मोठे नुकसान झाले आहे. आगीची झळ पोकलँडलाही लागली आहे. चालक व क्लिनर बचावले. महामार्गावरच घटना घडल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग आटोक्यात आली नाही. अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. काकती पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. चार दिवसांपूर्वी चन्नम्मा चौकात बर्निंग कारचा थरार घडला होता. सदर कारला शॉर्टसर्किटमुळे आग लागली होती. भूतरामहट्टी येथील घटनाही शॉर्टसर्किटमुळे घडल्याचा अंदाज आहे, घटनेची नोंद काकती पोलिस स्थानकात झाली आहे. 


  •