Fri, Sep 21, 2018 01:47होमपेज › Belgaon › ‘पुढारी’चा आज वर्धापन दिन 

‘पुढारी’चा आज वर्धापन दिन 

Published On: Jan 01 2018 1:54AM | Last Updated: Dec 31 2017 10:52PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी       

पश्‍चिम महाराष्ट्रासह बेळगाव व गोवा राज्यातील निर्भिड, निपक्षपाती दैनिक अशी ख्याती असलेल्या ‘दै.पुढारी’चा वर्धापन दिन सोमवार दि.1 जानेवारी रोजी साजरा होत आहे. ‘पुढारी’ स्थापनेचे यंदा 79 वे वर्ष आहे.

वर्धापन दिनाच्या निमित्ताने बेळगाव व निपाणी कार्यालयांत सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक, राजकीय, सहकार, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा  होईल. सकाळी 10 वा. बेळगाव व निपाणी कार्यालयात मान्यवरांच्या  हस्ते सोहळ्याचे उद्घाटन होणार आहे. 

वर्धापन दिनानिमित्त पुढारी व्हिजन न्यू इंडिया ही देशाच्या बदलत्या द‍ृष्टिकोनाची कल्पना देणारी पुरवणीही प्रसिद्ध करीत आहे. स्नेहमेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन पुढारी परिवाराने केले आहे.