Tue, Apr 23, 2019 07:35होमपेज › Belgaon › सरकारी शाळांच्या दुरुस्तीस 36 कोटी रुपयांची तरतूद

सरकारी शाळांच्या दुरुस्तीस 36 कोटी रुपयांची तरतूद

Published On: Aug 10 2018 12:56AM | Last Updated: Aug 09 2018 10:52PMबेळगाव : प्रतिनिधी

सरकारी शाळांतील   वर्गखोल्यांची पडझड होऊन दुर्घटना घडल्या आहेत. त्या टाळण्यासाठी सरकारने काम हाती घेतले आहे. प्राथमिक व माध्यमिक शाळांतील इमारती धोकादायक बनल्या आहेत. इमारतींच्या दुरुस्तीसाठी सरकारने 36 कोटी रुपये  मंजूर केले आहेत. त्यामधून शाळा दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. राज्यातील  प्राथमिक व माध्यमिक शाळांतील 3,688 वर्ग खोल्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. सरकारी व माध्यमिक शाळांतील 502 वर्गखोल्यांचे पुनर्बांंधकाम होणार आहे.  

विकास आराखडा अंतर्गत मंगळवारी निधीची तरतूद करण्यात आली आहे. 2018-19 च्या शैक्षणिक वर्षात सरकारी प्राथमिक शाळेला 16 कोटी आणि माध्यमिक शाळेसाठी 19 कोटी रुपये खर्चासाठीचा आदेश  शिक्षण खात्याने जारी केला आहे. सरकारी प्राथमिक व माध्यमिक वर्गखोली दुरुस्तीसाठी विकास आराखडा अंतर्गत 2018-19 च्या अर्थसंकल्पात 25.51 कोटी रुपयांची तरतूद केेली आहे.  त्यासाठी सार्वजनिक शिक्षण खात्याच्या आयुक्तांनी अनुमती दिली आहे. 

सरकारी व खासगी शाळांतून विद्यार्थ्यांवरील वाढता अत्याचार रोखण्यासाठी सीसीटीव्हीची सक्ती करण्यात आली. मात्र अनुदानित शाळांतून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. सरकारी शाळांतून निधीअभावी कामे रखडली होती . शिक्षण खात्याने शाळांतून सीसीटीव्ही कॅमेरे व बायोमेट्रिकसाठी एक कोटी रुपये मंजूर केले आहेत. अत्याचार रोखण्यासाठी सीसीटीव्हीची नजर असणार आहे. 

शंभर वर्षे पूर्ण झालेल्या शाळांची पारपंरिक शाळा ठेवण्यासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद केली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील तीन शाळांचे नूतनीकरण करून शाळा आदर्श करण्यात येणार आहेत. विकास आराखडा अंतर्गत शाळांतील शाळा सुधारणा समिती (एसडीएमसी), लोकवर्गणीतून, जिल्हा पंचायतीच्या अभियांत्रिकी विभाग आदींच्या सहाय्याने विकास करण्यात येणार आहे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाचे सचिव एस. आर. एस. नाथन यांनी आदेश काढला आहे.