Wed, Mar 20, 2019 23:13होमपेज › Belgaon › चिकोडी जिल्ह्यसाठी स्वामी रस्त्यावर 

चिकोडी जिल्ह्यसाठी स्वामी रस्त्यावर 

Published On: Mar 01 2018 2:54PM | Last Updated: Mar 01 2018 2:54PMबेळगाव : प्रतिनिधी

चिकोडा जिल्‍हा व्हावा या मागणीसाठी गेल्‍या दहा ते बारा दिवसांपासून आंदोलने सुरु आहेत. या आंदोलनात आता श्रीशैल पिठाचे चंन्नसीधराम पंडित अराध्य स्वामीजी व निडसोशी श्री पंचम शिवलिंगेश्वर स्वामींनीही सहभाग घेतला आहे. चंन्नसीधराम  पंडित अराध्य स्वामीजी आणि निडसोशी श्री पंचम शिवलिंगेश्वर स्वामीजींच्या नेतृत्वाखाली शहरातील आंबेडकर पुतळ्यापासून बसवेश्वर सरकलमार्गे  आंदोलन स्थळापर्यंत रॅली काढण्यात आली. 

या रॅलीत २० पेक्षा जास्‍त अधिक मठाधीशांनी सहभागी होऊन पाठींबा व्यक्त केला. जिल्हा मागणीचे निवेदन तहसीलदार चिदंबर कुलकर्णी यांना सादर करण्यात आले. 
यावेळी पंडित अराध्य स्वामी म्हणाले,‘‘ 25 किलोमीटर अंतरावर तालुका तर ७५ की मी जिल्हा केंद्र असावे, पण बेळगाव जिह्यातील टोकावरची अनेक गावे दोनशे कि. मी अंतरावर अहेत. यामुळे पैसा, वेळ आणि श्रम वाया जात असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. चिकोडी  जिल्ह्यसाठी आवश्यक सर्व कार्यालये व सोयी अस्तित्वात आहेत. त्यामुळे जिह्याचे नामकरण करून ते जाहीर करणे शिल्लक आहे.’’ 

‘‘सर्व नेत्यांनी एकत्रीत गेल्यास सरकार निश्चितपणे जिल्हा जाहीर करेल, आपण व सर्व मठांकडून मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविणार आहे. या विषयी भागातील सर्व नेत्यांना जिल्हा करण्यास सांगणार असल्याचे,’’ स्‍वामी म्‍हणाले. 

आंदोलन कशासाठी? 
बेळगाव जिल्हा राज्यातील भोगोलीकदृष्ट्या सर्वाधिक मोठा जिल्हा आहे. यामुळे प्रशासकीय कारभार व सरकारी योजना पोचण्यासाठी अडचणी येतात. अनेक गावांना जिल्हा केंद्र दोनशे किमी लांब असल्यामुळे  नागरिकांची गैरसोय होते.  

या जिल्हयाची विभागणी करून बेळगाव,  चिकोडी, गोकाक अशा नवीन तीन जिल्यांची निर्मीती करण्याची मागणी गेल्‍या 20 वर्षांपासून होत आहे. 

यासाठी अनेक आंदोलने झाली 
1997 साली तत्कालीन मुख्यमंत्री जे. एच. पटेल यांनी चिकोडी जिल्ह्याची  घोषणा  केली होती. मात्र, काहींच्या विरोधामुळ ही घोषणा त्‍यांनी मागे घेतली होती. मागच्या निवडणुकीत काँग्रेसने आपल्‍या जाहीरनाम्यात चिकोडी जिल्हा करण्याचे अशवासन दिले होते. त्यानंतर चार महिन्यांपूर्वी चिकोडीत मुख्यमंत्र्यांनी  जिल्ह्याविषयी सकारात्मक आल्याचे सांगितले होते. तसेच २६ जानेवारी रोजी घोषणा होणार असल्याचे लोकप्रतिनिधींनी सांगितले होते. पण, तशी घोषणा झाली नसल्याने मागील 25 दिवसांपासून जिल्हा आंदोनलन समितीकडून आंदोलन सुरु आहे