Sun, Jul 21, 2019 01:26होमपेज › Belgaon › वेश्याव्यावसायाकडे पोलिसांचा काणाडोळा

वेश्याव्यावसायाकडे पोलिसांचा काणाडोळा

Published On: Jun 20 2018 1:13AM | Last Updated: Jun 20 2018 12:22AMबेळगाव : प्रतिनिधी

पोलिस आयुक्त कार्यालयात झालेल्या जनता दर्शन कार्यक्रमात शहरातील वेश्याव्यवसायाचा मुद्दा उपस्थित करून पोलिस खात्यातील गलथान कारभार चव्हाट्यावर आणला गेला.पोलिस आयुक्त डी. सी.राजाप्पा यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या पहिल्याच जनतादर्शन कार्यक्रमात नागरिकांनी पोलिसांकडून समस्येचे निवारण करण्याची जबाबदारी कशा प्रकारे ढकलली जाते याची जाणीव आयुक्तांना करून दिली. 

तत्कालीन जिल्हापोलिस प्रमुख संदीप पाटील यांनी प्रारंभ केलेला जनता दर्शनाचा कार्यक्रम यशस्वी ठरला होता. त्यानंतर पोलिसप्रमुख रविकांतेगौडा यांनी हा कार्यक्रम सुरू केला होता. यानंतर सदर कार्यक्रम स्थगित झाला होता.  

आयुक्तांच्या पहिल्या जनता दर्शन कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थिती दर्शवून समस्या मांडल्या. यामध्ये वैयक्तीक समस्यांसह सार्वजनिक समस्याही मांडल्या. शहरातील नरगुंदकरभावे चौकामध्ये सुरू असलेल्या वैश्या व्यावसायासंदर्भात बाबुलाल पुरोहित यांनी प्रश्‍न उपस्थित करून पोलिस अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून देऊनही दुर्लक्ष करण्यात आल्याची तक्रार आयुक्तांसमोर मांडली. सदर वेश्या व्यावसायामुळे  या भागात रात्रीच्या वेळी व्यावसायिकांना, नागरिकांना, महिलांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत पोलिसस्थानकात तक्रारही देण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी जबाबदारी झटकली आहे. मार्केट पोलिसांनी खडेबाजार पोलिसस्थानकाकडे तर खडेबाजार पोलिसांनी मार्केट पोलिसस्थानकाकडे बोट दाखवून नागरिकांच्या समस्येकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे आपण भारतात आहोत की पाकिस्तानात असा प्रश्‍न उपस्थित करून आयुक्तांसमोर समस्येचा पाढा वाचला. यावेळी आयुक्तांनी सदर बाब गांभीर्याने घेऊन याची त्वरीत दखल घेण्याची सूचना संबंधित पोलिस अधिकार्‍यांना केली.