Sat, Nov 17, 2018 09:58होमपेज › Belgaon › प्रतिबेळगावसाठी हवा पाठपुरावा

प्रतिबेळगावसाठी हवा पाठपुरावा

Published On: Feb 16 2018 1:53AM | Last Updated: Feb 15 2018 11:22PMबेळगाव : प्रतिनिधी    

बेळगाव व सीमाभागातील मराठी भाषिक कानडी वरवंट्याला कंटाळलेले आहेत. कर्नाटकात कोणत्याही पक्षाचे सरकार असो मराठी भाषिकावर हरएक प्रकारे अन्यायाच करत आहेत. अशा स्थितीत 1990च्या काळात चंदगड तालुक्यात प्रतिबेळगाव वसवण्याचा तत्कालीन महाराष्ट्र सरकारचा विचार होता. तो आता पुन्हा नव्याने चर्चेला आला आहे.

चार दिवसांपूर्वी चंदगडमधील एका कार्यक्रमात माजी अपारंपरिक मंत्री विनय कोरे यांनी सीमा भागाचे समन्वयक व महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे प्रतिबेळगावची मागणी करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरवा करण्याचा सूतोवाच केले आहे.

सीमालढा अंतिम टप्यात असला तरी कर्नाटकाच्या झुंडशाहीच्या निषेधार्थ मायबाप असलेल्या महाराष्ट्र राज्यातील अनेक नेत्यांनी शेजारचे चंदगड तालुक्यात नवीन बेळगाव निर्मितीची मागणी गेल्या 25 वर्षापासून केली आहे. या बाबत बेळगाव शहरातील सीमा लढ्यात सक्रीय असणार्‍या कार्यकर्त्यांनी नवीन बेळगावच्या संकल्पनेबाबत संमिश्र भावना व्यक्त केल्या.